पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप

पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणात छोटा राजनसह 9 दोषींना जन्मठेप

अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनसह 9 आरोपी दोषी ठरवण्यात आले आहेत. छोटा राजन हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. तर पोल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना व्होरा यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.

  • Share this:

02 मे : पत्रकार जे. डे. यांच्या हत्येच्या खटल्याचा आज निकाल लागला आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनसह  9 आरोपी दोषी ठरवण्यात आले आहेत. या सर्व दोषींना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. छोटा राजन हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. तर पोल्सन जोसेफ आणि पत्रकार जिग्ना व्होरा यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे. विशेष मोक्का न्यायालयानं दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून याविषयीची सुनावणी पूर्ण केल्यानंतर आज हा निकाल दिला.

सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, नयनसिंग बिस्त, मंगेश आगनावे, विनोद आसरानी, यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.  तर जिग्ना व्होरा आणि पॉलसन जोसेफ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

वरिष्ठ पत्रकार जे. डे. यांची ११ जून २०११ रोजी भरदिवसा पवई येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. क्राईम ब्रांचनं 14 दिवसांत प्रकरणाचा छडा लावत 7 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी 4 आरोपींना अटक करण्यात आली. एका आरोपीला म्हणजेच छोटा राजनला सीबीआयनं अटक केली. तर एक आरोपी अजूनही फरार आहे.

क्राईम ब्रांचनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. सीबीआयने याप्रकरणी तपासाअंती ५ ऑगस्ट २०१६ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होतं. त्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१६ रोजी आरोपींवर आरोप निश्चित केले. सरकारी व बचाव पक्षाकडून साक्षी पुरावे नोंदवण्यात आले.

या हत्ये प्रकरणातातील अटक आरोपी

- छोटा राजन

- पत्रकार जिग्ना व्होरा,

- सतीश काल्या,

- अभिजित शिंदे,

- अरुण डाके,

- सचिन गायकवाड,

- अनिल वाघमोडे,

- नीलेश शेंडगे,

- मंगेश आगनावे,

- विनोद आसरानी,

- पॉलसन जोसेफ,

- सचिन गायकवाड

तर फरार आरोपी

- नयनसिंग बिस्त

या आरोपींच्या विरोधात जे.डे. यांच्या हत्येचा कट रचून प्रत्यक्ष हत्या करणे, मोक्का तसेच शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली खटला भरला होता. त्यापैकी विनोद आसरानी हा खटला सुरू असतानाच्या काळात मरण पावल्याने फक्त 12 आरोपींविरुद्ध प्रत्यक्ष खटला चालविण्यात आला.

जे. डे. यांच्या हत्येसंदर्भात माहिती देण्यासाठी छोटा राजन याने ज्या पत्रकारांना फोन केले होते त्या पत्रकारांसह १५५ साक्षीदार तपासण्यात आले. जे. डे. आणि छोटा राजनचे संबंध चांगले होते, याची जाणिव माध्यमातल्या अनेकांना होती.

अनेक पत्रकारांचे अंडरवर्ल्डमध्ये वेगवेगळे सोर्सेस होते. आणि बातम्यांसाठी चढाओढही होती. याच चढाओढीतून जे डेंबद्दल चुकीची माहीती एका महिला पत्रकारानं छोटा राजनला दिली होती. आणि त्यातूनच पुढे जे डेंची हत्या करण्यात आली होती.

First published: May 2, 2018, 10:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading