झाकीर नाईकच्या शाळेत शांततेचा संदेश दिला जातो, अबू आझमींकडून कौतुक

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी झाकीर नाईकच्या शाळेचं पुन्हा एकदा कौतुक केलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 20, 2017 02:48 PM IST

झाकीर नाईकच्या शाळेत शांततेचा संदेश दिला जातो, अबू आझमींकडून कौतुक

20 मे : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी झाकीर नाईकच्या शाळेचं पुन्हा एकदा कौतुक केलंय. झाकीर नाईकच्या शाळा चांगल्या आहेत अशी स्तुतीसुमनं अबू आझमींनी उधळली.

भिवंडी महानगरपालिका निवडणूक चांगलीच रंगात आलीये. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, समाजवादीचे अबू आझमी यांची काल जाहीर सभा झाली. यासभेनंतर मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना अबू आझमींनी झाकीर नाईकच्या शाळेचे गोडवे गायले. झाकीर नाईकच्या शाळांना जिहादशी जोडलेलं सांगणं हे  चुकीचं आहे असं अबू आझमी पटवून दिलं.  तसंच झाकीर नाईकांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना शांततेचा संदेश दिला जातो हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

तर सभेत या सर्व नेत्यांनी भाजप-शिवसेना युती सरकार आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. तर पाकिस्तानच्या मैत्रीमुळे कुलभूषण जाधव यांची फाशी थांबली असं खा.मनोज तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2017 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...