Home /News /mumbai /

मुंबईच्या रस्त्यावरचा बिस्लेरी पाणीपुरीवाला Corona मुळे गेला; नागरिकांनी 24 तासांत उभा केला निधी

मुंबईच्या रस्त्यावरचा बिस्लेरी पाणीपुरीवाला Corona मुळे गेला; नागरिकांनी 24 तासांत उभा केला निधी

आपल्या आवडीचा पाणीपुरीवाला अशा पद्धतीने अचानक गेल्याचं कळल्यावर दक्षिण मुंबईच्या परिसरातल्या नागरिकांनी नुसतीच हळहळ व्यक्त केली नाही की सहानुभूती दर्शवणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या नाहीत.

  मुंबई, 24 जून : बिस्लेरी पाणीपुरीवाला अशी ओळख असलेले मुंबईच्या रस्त्यावर नियमितपणे पाणीपुरी आणि चाट विकणारे भगवती यादव यांचं Coronavirus च्या संसर्गाने निधन झालं. आपल्या आवडीचा पाणीपुरीवाला अशा पद्धतीने अचानक गेल्याचं कळल्यावर दक्षिण मुंबईच्या परिसरातल्या नागरिकांनी नुसतीच हळहळ व्यक्त केली नाही की सहानुभूती दर्शवणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या नाहीत. सोशल मीडियावर आवाहन करत त्यांनी यादव यांच्या कुटुंबासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली. पाच लाख रुपयांचा फंड हे सामान्य मुंबईकर त्यांच्या लाडक्या पाणीपुरीवाल्याच्या कुटुंबीयांना आता देणार आहेत. दक्षिण मुंबई परिसरात राहणारे आणि तिथे नियमित वावरणाऱ्या काही जणांना भगवती यादव यांच्या निधनाचं वृत्त समजलं. त्यांनी whatsapp ग्रूपच्या आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांपर्यंत ही बातमी पोहोचवली. तेव्हा या सामान्य परिस्थितीत जगलेल्या लाडक्या पाणीपुरी विक्रेत्यासाठी काही करायचं ठरलं. क्राउड फंडिगच्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर 24 तासांत पावणे दोन लाखांचा निधी जमला असल्याची बातमी मुंबई मिररने दिली आहे.

  भारत-चीन सीमेवरील IES अधिकारी बेपत्ता; घरात सुरू आहे लग्नाची तयारी

  भगवती यादव गेली किमान 4 दशकं मुंबईत रस्त्यावर चाट विकत होते. त्यांच्या हातची दही पुरी आणि खास बाटलीबंद पाण्यात बनवलेली पाणीपुरी प्रसिद्ध होती. नेपीयन सी रोड परिसरात रस्त्यावर ते हा व्यवसाय करत. संध्याकाळनंतर ते आपल्या पिशव्या घेऊन येत असत. भगवती यादव यांची पाणीपुरी, दहीपुरी खाल्लेली अनेक लोक आता मुंबई सोडून इतरत्र स्थायिक झाली आहेत. अनेक जण परदेशात आहेत. परदेशातल्याही काही व्यक्तींनी या पाणीपुरीवाल्यासाठी मदत पाठवली आहे. डोकं जोडलेलं असूनही वेगवेगळे पेपर लिहून सयामी जुळ्या झाल्या दहावी पास यादव यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांची तरुण मुलगी आणि पत्नी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर उत्तर प्रदेशात आझमगडला त्यांच्या गावी रवाना झाल्या. आमच्या घरचा कमावता धनीच गेल्यामुळे गावी येण्यावाचून पर्याय नव्हता, असं त्याचे कुटुंबीय सांगतात. त्यांच्या मुलीने वडिलांवरच्या प्रेमाखातर ग्राहक निधी जमा करत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केलं. आम्हाला त्यातून थोडी मदत होईल, असं ती म्हणाली. संकलन - अरुंधती
  First published:

  Tags: Coronavirus, South mumbai

  पुढील बातम्या