मुंबई कुणाची? राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण?

मुंबई कुणाची? राहुल शेवाळे VS एकनाथ गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईत येणार कोण?

दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता.

  • Share this:

मुंबई, 11 मे : दक्षिण मध्य मुंबई म्हणजे दादर, माहीम यासारखा शहरी मध्यमवर्गियांचा भाग आणि धारावीमधले कष्टकरी गरीब लोक असा संमिश्र स्वरूपाचा राखीव मतदारसंघ. इथे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड अशी लढत झाली. इथे चुरशीची लढत पाहायला मिळाली.

विकास प्रकल्पांचे मुद्दे

मेट्रो रेल्वे, मोनोसारखे वाहतूक प्रकल्प आणि घरबांधणी असे विकासप्रकल्प यावेळी निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे होते. त्याचबरोबर नोटबंदी, जीएसटी, शहरी भागातली वाहतुकीची संरचना, प्रवाशांची सुरक्षितता या मुद्द्यांचं आव्हान इथे सत्ताधारी भाजपसमोर होतं.

धारावीचा पुनर्विकास

धारावीचा पुनर्विकास, माहूलचं प्रदूषण असेही मुद्दे या निवडणुकीत गाजले. काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी राहुल शेवाळेंसमोर यावेळी चांगलंच आव्हान निर्माण केलं.

पुन्हा आमनेसामने

2009 मध्ये इथे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. आता पुन्हा एकदा हेच उमेदवार आमनेसामने होते.

दक्षिण मध्य मुंबईमध्ये माहीम, चेंबूर, सायन कोळीवाडा, धारावी, वडाळा, अणुशक्तीनगर या विधानसभा जागा येतात. या सगळ्या मतदारसंघात आघाडी आणि युतीचाही कस लागला.

मनसे फॅक्टर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हाही मुंबईच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनला होता. राज ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत भाजप सरकारवर जोरदार टीका करत होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईत राज ठाकरे यांच्या सभांमुळे शिवसेना भाजप युतीचं नुकसान होईल का, अशी चर्चा इथे रंगली होती.

================================================================================

SPECIAL REPORT: मुंबईत 'वंचित'मुळे कोणाची उमेदवारी धोक्यात?

First published: May 11, 2019, 5:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading