CM उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर काय घडलं? सोनू सूदने दिली पहिली प्रतिक्रिया

CM उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर काय घडलं? सोनू सूदने दिली पहिली प्रतिक्रिया

'मला कुठलाही राजकीय पक्ष मदत करत नाहीये. सर्व देश माझं कुटुंब आहे. आणि मी त्या कुटुंबातला एक सदस्य आहे.'

  • Share this:

विवेक पांडे, मुंबई 8 जून:  बऱ्याच वाद विवादानंतर अभिनेता सोनू सूदने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रात्री साडे दहा वाजता मातोश्रीवर जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. त्यानंतर आज (सोमवारी) सोनू सूदने मातोश्रीवर नेमकं काय झालं ते सांगत प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकार उत्तम काम करत आहे. त्यांचीही मला मदतच होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सोनू सूद म्हणाले, मला फक्त काम करायचं आहे. राजकारण नाही. लोकांना मला घरी पोहोचवायचं आहे. रविवारी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याशी अतिशय चांगली चर्चा केली. ते पण माझ्या कामात मला मदतच करणार आहेत. ते सुद्धा मजुरांना आपल्या घरीच पोहोचवित आहेत. मलाही मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवायचं आहे.

मला कुठलाही राजकीय पक्ष मदत करत नाहीये. सर्व देश माझं कुटुंब आहे. आणि मी त्या कुटुंबातला एक सदस्य आहे.  सोनू सूदने काही दिवसांपूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर जोरदार टीका केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अंदाज ठरतोय खरा, आजही राज्यात 2553 नव्या रुग्णांची भर

सोनू सूदच्या मागे काही राजकीय शक्ती आहे अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली होती. तर अखेर सोनू सूद महाशयांना मुख्यमंत्र्यांच्या घराचा पत्ता सापडला अशीही टीका त्यांनी रविवारीच केली होती. आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

हे वाचा - 

सूट मिळताच पुण्यातल्या 'या' भागात मोठा फटका, 12 रुग्णांवरून आकडा थेट 372 वर

मोठा निर्णय! Covid काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं विमा संरक्षण

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: June 8, 2020, 9:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading