शपथविधीच्या काही तास आधी सोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाल्या...

शपथविधीच्या काही तास आधी सोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाल्या...

'अतिशय वेगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार येत आहे. त्याचा किमान समान कार्यक्रमही ठरलाय. हा कार्यक्रम राबविण्यास तुम्हाला यश येईल यात शंका नाही.'

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : राज्यात महाआघाडीच्या सरकारचा शपथविधी शिवाजी पार्कवर होऊ घातलाय. या शपथविधी कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावरचे कोण कोण नेते येणार याची चर्चा सुरू झालीय. काँग्रेसचे अनेक नेते आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. मात्र सगळ्यांना उत्सुकता होती ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी या कार्यक्रमाला येणार का याची. ही उत्सुकता असतानाच सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आणि त्यांनी आपण उपस्थित राहणार का याबद्दलही कळवलं. सोनिया गांधी म्हणाल्या, आदित्य ठाकरेंनी भेटून मला निमंत्रण दिलं त्याबद्दल धन्यवाद. मात्र मी या शपधविधी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल मला खेद वाटतो. अतिशय वेगळ्या परिस्थितीत महाराष्ट्रात सरकार येत आहे. त्याचा किमान समान कार्यक्रमही ठरलाय. हा कार्यक्रम राबविण्यास तुम्हाला यश येईल यात शंका नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्या आधी काही तास आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम घोषीत केला. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सरकारबनविण्यासाठी एकत्र आल्याने त्यांनी तीनही पक्षांच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे एकत्र करत हा किमान समान कार्यक्रम तयार केला आहे.

उद्धव ठाकरे सरकारचा तो मुख्य अजेंडा राहणार असून सर्वांच्या विकासासाठी हे सरकार काम करेल असंही या नेत्यांनी सांगितलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार.  हा असेल मुख्य फोकस - शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, सर्व जाती धर्म आणि प्रादेशिक विभाग, SC, ST, OBC धार्मिक आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट यांना सोबत घेऊन काम करणार.

काँग्रेसच्या दोन दिग्गज चव्हाणांची नावं पडली मागे, हे आहे त्याचं कारण

किमान समान कार्यक्रमातले मुख्य मुद्दे

कर्ज आणि दुष्काळाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना  कर्जमाफी.

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी मदत करणार.

शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळवून देणार.

कृषीमालाच्या योग्य भाव देण्याची हमी देणाक.

गरिबांना शिक्षणा साठी 0% व्याजाने ने कर्ज देणार.

''उद्धव यांनी वडिलांचा 'हिंदुत्त्ववाद' नव्हे आजोबांचा 'निर्धमीवाद' अंगीकारावा''

रोजगारामध्ये स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य.

मुलींना मोफत शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य.

सामान्य नागरिकांसाठी 10 रुपयांमध्ये थाळी.

500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट.

दुष्काळासाठी दीर्घकालीन उपययोजना करणार.

सर्व कार्यक्रम घटनेतल्या तत्वांना आणि धर्मनिरपेक्षतेला धरून असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2019 05:31 PM IST

ताज्या बातम्या