काँग्रेस नेते 'दिल्ली दरबारी', शिवसेनेला पाठिंब्याच्या मुद्द्यावर काय म्हणाल्या सोनिया

जर शिवसेनेसोबत जायचं असेल तर काँग्रेसने राम मंदिराच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी?

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 08:04 PM IST

काँग्रेस नेते 'दिल्ली दरबारी', शिवसेनेला पाठिंब्याच्या मुद्द्यावर काय म्हणाल्या सोनिया

प्रशांत लीला रामदास,(प्रतिनिधी)

नवी दिल्ली,1 नोव्हेंबर: काँग्रेस नेते 'दिल्ली दरबारी' आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पृथ्वीराज चव्हाण एक दिवस आधीच दिल्लीत पोहोचले होते. गुरुवारी रात्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे पोहोचले. दिल्लीत पोहोचतात काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींची वेळ मागितली होती. पण, सोनिया गांधींनी काँग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल यांची भेट घेण्याची आदेश दिला होता. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची दिल्ली वारी फसली अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी सायंकाळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याना भेटण्यासाठी बोलवणे पाठवले.

बैठकीत या मुद्द्यावर झाली चर्चा..

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती,निवडणुकीत मतांचे विभाजन अशा अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा मुद्दाच चर्चेत आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

काढली खरडपट्टी...

Loading...

सोनिया गांधी यांची भेट घेण्याआधी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सर्व काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे अनुपस्थितीत होते. जर शिवसेनेसोबत जायचं असेल तर काँग्रेसने राम मंदिराच्या संदर्भात काय भूमिका घ्यावी? काश्मीरमध्ये लावण्यात आलेल्या 370 कलम संदर्भात काय भूमिका घ्यावी? वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेसने काय भूमिका घ्यावी? असे सवाल करून वेणुगोपाल यांनी काँग्रेस नेत्यांची खरडपट्टी काढली. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवसेनेसोबत असलेल्या सलगीमधून शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यामुळे शिवसेनेसोबत कदापिही जाऊ शकत नाही, असे वेणुगोपाल यांनी बजावल्याचे सूत्रांची माहिती दिली. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहाखातर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा हा विचार काँग्रेसमध्ये चर्चेत आला होता.

पण त्या विरोधात सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी विरोधी पक्षात बसायची कल्पना मांडली होती. तरीही पृथ्वीराज चव्हाण यांच्या आग्रहाखातर हा सारा खटाटोप केल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोनिया गांधी यांची भूमिका माहीत असल्यामुळे स्पष्टपणे विरोधी पक्षात बसण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाने जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी देखील विरोधी पक्षात बसणार असल्याचे स्पष्ट केले होते.

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत, काय म्हणाले शरद पवार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...