मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /शिवाजी पार्कवर धडाडणार सोनिया आणि राहुल गांधींची तोफ, काँग्रेसने फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग

शिवाजी पार्कवर धडाडणार सोनिया आणि राहुल गांधींची तोफ, काँग्रेसने फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग

'कोकण, रायगडमध्ये दरडी कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. अशी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत'

'कोकण, रायगडमध्ये दरडी कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. अशी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत'

'कोकण, रायगडमध्ये दरडी कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. अशी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत'

मुंबई, 06 ऑगस्ट : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (mumbai municipal corporation election)  पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपपाठोपाठ (bjp) आता काँग्रेसनेही (congress) मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून दादरमधील शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर (shivaji park dadar) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांची सभा होणार आहे. या सभेतून काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची (congress) बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील (h k patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

अपयश येऊनही सोडले नाहीत प्रयत्न; IAS गुंजन द्विवेदी यांची ‘Smart Study Strategy’

निवडणुकीच्या आधी मुंबईत काँग्रेसचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथे 28 डिसेंबरला हा मेळावा पार पडले. अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे मेळाव्याला उपस्थितीत राहणार आहे.  काँग्रेस स्थापना दिवस पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम असेल, असं पाटील यांनी सांगितलं.

आज मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा झाली असली तर आघाडी कोणाशी करावी का? या बाबत चर्चा नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

'जर-तरला अर्थ नाही', राज ठाकरे-चंद्रकांत पाटलांच्या भेटीवर फडणवीसांची 'गुगली'!

तसंच, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार च नाव बदलणं हे राजकीय हेतूने प्रेरित आणि दूषित मनाने केलेलं कृत्य आहे.  या आधी ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार आहे. पण, तरीही नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली.

केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत का करत नाही? महाराष्ट्रात पूर परिस्थिती गंभीर आहे. कोकण, रायगडमध्ये दरडी कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. अशी परिस्थिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, त्यांनी महाराष्ट्रात दौरा का केला नाही?  असा परखड सवाल पाटील यांनी विचारला.

बाळासाहेब थोरात यांचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर न भविष्यात राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंडा घेण्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले. भाजप आणि मनसे महापालिकेच्या निवडणुकीत एकत्रित येण्याच्या चर्चेला यामुळे अधिकच बळ मिळाले आहे. राजकीय वर्तुळात या भेटीवर वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना भाजपा विषयी केलेली भाषणं आठवत असतील, त्यांनी ज्या पद्धतीने भाजपावर टीका केली आहे, त्यावरून तरी किमान राज ठाकरे भविष्यात भाजपा सोबत जातील असं तुर्तास तरी वाटत नाही, असंही थोरात म्हणाले.

First published:
top videos