भिवंडीमध्ये धक्कादायक घटना, छोट्याश्या चुकीने झाला बाप-लेकाचा मृत्यू

भिवंडी शहरातील अवचित पाडा या परिसरात रस्त्यावरील ड्रेनेज लाईनमध्ये बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 01:33 PM IST

भिवंडीमध्ये धक्कादायक घटना, छोट्याश्या चुकीने झाला बाप-लेकाचा मृत्यू

भिवंडी, 31 ऑगस्ट : भिवंडी शहरातील अवचित पाडा या परिसरात रस्त्यावरील ड्रेनेज लाईनमध्ये बापलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ड्रेनेज लाईनमधून तबेल्यासाठी अनधिकृतपणे पाणी वापरत  होते. त्यासाठी त्यांनी ड्रेनेज लाईनमध्ये अनधिकृत पद्धतीने मोटरही बसवले होते. पण आज सकाळपासून मोटरमधून पाणी येत नसल्याने मोटर पाहण्यासाठी गेलेला मुलगा का आला नाही म्हणून त्याचे वडील पाहण्यासाठी गेले आणि दोघेही ड्रेनेज लाईनमध्ये अडकून राहीले. बऱ्याच वेळ पाण्यात असल्याने वडिल आणि मुलगा या दोघांचा मृत्यू झाला आहे.

हे दोघेही ड्रेनेजमध्ये अडकल्याची माहिती मिळताच अनेक कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून ते शक्य झालं नाही. त्यानंतर याबद्दल अग्निशमन दलाला सांगण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बापलेकांना बाहेर काढलं. त्यांना लगेचच जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत या दोघांचाही मृत्यू झाला होता.

इलेक्ट्रिक शॉक लागून या दोन्ही बापलेकांचा मृत्यू झाला किंवा ड्रेनेज लाईनमध्ये गुदमरून यांचा मृत्यू असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. दरम्यान, रमेश राठोड वय 19 (मुलगा) चंद्रकांत राठोड वय 50 (वडील) अशी मृतांची नावं आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शांतीनगर पोलीस याचा पुढील तपास करीत आहे.

तर बाप आणि मुलाच्या अशा जाण्याने राठोड कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2018 01:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close