शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट, कॅबिनेट मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

राज्यमंत्री असलेल्या विजय शिवतारे आणि संजय राठोड यांना प्रमोशन मिळण्याची चर्चा आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2017 08:59 PM IST

शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खांदेपालट, कॅबिनेट मंत्र्यांना मिळणार डच्चू ?

03 एप्रिल : सत्तेत वाटेकरू असलेल्या शिवसेनेनं आपल्या मंत्र्यांच्या खांदेपालट करण्याची तयारी सुरू केलीये. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. गुरुवारी 6 एप्रिलला 'मातोश्री'वर ही बैठक संध्याकाळी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या शिलेदारांमध्ये धुसफूस सुरू आहे. आपल्याच मंत्र्यांविरोधात सेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी दूर करण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर बैठका घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण, यावर कोणताही परिणाम झाला नाही.

कॅबिनेटमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डाॅ.दीपक सावंत यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आमदारांची नाराजी आहे. आतापर्यंत तीनवेळा शिवसेनेच्या आमदारांच्या बैठका झाल्या असून या बैठकीत आमचीच कामं होत नाही. आपण सरकारमध्ये आहोत का ?, असा सवाल बैठकीत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. तसंच हे चारही मंत्री विधानपरिषदेवर निवडून आले असून थेट जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना डावललं जातंय अशी भावना आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही व्यक्त केल्याचंही समजतंय. ज्या कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू दिला जाईल त्यांचा पक्षकार्यासाठी वापर केला जाईल.

त्यामुळे राज्यमंत्री असलेल्या विजय शिवतारे आणि संजय राठोड यांना प्रमोशन मिळण्याची चर्चा आहे. तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर सेना आमदारांची कोणतेही काम करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. तसंच नाशिकमधून निवडून आलेले दादा भूसे यांचीही कामगिरी सुमार आहे.

दरम्यान,सुभाष देसाई यांना डच्चू मिळाल्यास त्यांच्या जागी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू किंवा कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Loading...

त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्री आणि आमदारांनी 6 एप्रिलला संध्याकाळी 'मातोश्री'वर बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय घडते हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...