मुंबईसह किनारपट्टी भागात 26/11 सारख्या हल्ल्याची शक्यता; संरक्षण मंत्र्यांनी दिला अलर्ट!

मुंबईसह किनारपट्टी भागात 26/11 सारख्या हल्ल्याची शक्यता; संरक्षण मंत्र्यांनी दिला अलर्ट!

पाकिस्तानमधील काही दहशतवादी संघटना मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर: पाकिस्तानमधील काही दहशतवादी संघटना मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्या माहितीनुसार दहशतवादी समुद्रमार्गे मुंबई तसचे अन्य किनारपट्टी भागात हल्ला करू शकतात. पण अशा प्रकारच्या योजनेत ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. भारताचे नौदल दहशतवादी हल्ले रोखण्यास सक्षम असल्याचे सिंग यांनी सांगितले.

आता शत्रूची खैर नाही! भारतीय नौदलाच्या सेवेत पाणबुडी 'INS खांदेरी' दाखल

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरात फिरत आहेत. पण त्यांचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे. त्यामुळेच त्यांना कोणी उभे देखीर करून घेत नाही. भारताचे पंतप्रधान जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले तेव्हा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे शानदार स्वागत केले. मोदींचे स्वागत कशा प्रकारे झाले हो संपूर्ण जगाने पाहिले. त्याचवेळी पाकिस्तानचे पंतप्रधान जगासमोर उघडे पडले. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना मदत करते हे जगाला समजले आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची आय.एन.एस.खांदेही या पाणबुडीचे सिंग यांच्या हस्ते जलावरण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. INS खांदेरी ही कलवरी श्रेणीतील दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीत डिझेल-विद्युत प्रकारातील अद्यापत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

भारताला वारंवार युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने हे समजून घेणे गरजेचे आहे की INS खांदेरी शत्रूचा नायनाट करू शकते. 1971च्या युद्धात देखील नौदलाने स्वत:ची ताकद दाखवली होती, असा इशारा सिंग यांनी पाकला दिला. जागतीक व्यासपीठावर काश्मीर आणि भारतासंदर्भात चुकीचे गैरसमज पसरवणारे पाकिस्तान उघडे पडले आहे. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे आणि आमच्या नियंत्रणात असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.

CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास

First published: September 28, 2019, 10:24 AM IST

ताज्या बातम्या