मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'उद्या काही सरकारी पाहुणे घरी येणार', नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

'उद्या काही सरकारी पाहुणे घरी येणार', नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी आपली चौकशी होणार अशी शक्यता बोलून दाखवली होती.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 19 डिसेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drugs Party Case) राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची मालिका लावून एकच धुरळा उडवून दिला. पण, आता 'काही सरकारी पाहुणे उद्या सकाळी घरी येणार आहे', असा दावा मलिक यांनी केला आहे. त्यांच्या ट्वीटमुळे (nawab malik tweet)  एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी आपली चौकशी होणार अशी शक्यता बोलून दाखवली होती. आज पुन्हा एकदा मलिक यांनी ट्वीट करून नवीन दावा केला आहे.

'उद्या सकाळी काही सरकारी पाहुणे माझ्या घरी येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे.

तसंच, ते माझ्या येणार अशी माहिती मिळाली आहे, त्यामुळे मी त्यांचे चहा आणि बिस्किटाने मनापासून स्वागत करण्यास तयार आहे. त्यांना योग्य पत्ता हवा असल्यास ते मला कॉल करू शकतात, असा टोलाही मलिक यांनी लगावला.

याआधीही १० डिसेंबर रोजी नवाब मलिक यांनी ट्वीट करून असाच दावा केला होता. 'साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है' असं म्हणत मलिक यांनी सरकारी संस्थेकडून चौकशीचे संकेत दिले होते.

लग्नानंतर कतरिना पहिल्यांदा सलमानसोबत 15 दिवसांसाठी जाणार 'या' ठिकाणी

काही दिवसांपूर्वीच, वानखेडे कुटुंबावर मलिक यांनी पुराव्यानिशी आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडवून दिली होती. याच प्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांना ट्वीटपासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मलिक यांच्याविरोधात १ कोटी २५ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा केला. तसंच, मलिक यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यास मनाई करावी अशी मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणी मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत हायकोर्टात बिनशर्त माफी मागितली होती. तसंच, यापुढे कोणतीही विधाने करणार नाही, अशी हमीच मलिक यांनी कोर्टात दिली होती.

First published: