शिवसेनेसोबत आघाडी करताना विश्वासात घ्या; नाहीतर पक्ष संपेल, काँग्रेस नेत्याचा पक्षश्रेष्ठींना इशारा

शिवसेनेसोबत आघाडी करताना विश्वासात घ्या; नाहीतर पक्ष संपेल, काँग्रेस नेत्याचा पक्षश्रेष्ठींना इशारा

कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या अन्यथा काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेपासून दुरावले आणि पक्षाचं मोठं नुकसान होईल.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रात  वरिष्ठ पातळीवर महाशिवआघाडी अजूनही डळमळीत असतानाच काँग्रेसमधूनच आता विरोधाचे सूर उमटत आहेत. जर महाशिवआघाडी होत असेल तर जिल्हास्तरावर बैठक घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या अन्यथा काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता पक्षाच्या विचारधारेपासून दुरावेल आणि उर्वरित काँग्रेस मात्र संपायला वेळ लागणार नाही असा इशारा काँग्रेसचे नेते आणि नगसेवक विक्रांत चव्हाण यांनी दिलाय. त्यांनी पक्षाच्या कार्यालयातच पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. त्यामुळे काँग्रेसला शिवसेनेसोबत आघाडी करताना जास्तच विचार करावा लागेल अशी शक्यता आहे. ठाण्यात काँग्रेसची लढाई ही शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे चव्हाण यांनी ठाण्यातील शिवसेना नेतृत्वावरही संशय व्यक्त केला आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे बोलतात एक आणि करतात एक अशी टीकाही विक्रांत चव्हाण यांनी केलीय.

शिवसेनेचे कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

विक्रांत चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडीच्या हालचाली जोरदार सुरु आहेत. मात्र जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांचा विचार हायकमांड करीत नाही. महाशिवआघाडीला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध नाही. पण जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा. चव्हाण पुढे म्हणाले, ठाण्यात विधानसभेत राष्ट्रवादीला ठाणे शहर विधानसभा सीट सोडली. राष्ट्रवादीने ती सीट मनसेला  सोडली. मात्र ओवळा माजिवडा आणि कोपरी विधानसभा मतदार संघात मनसेने उमेदवार दिला मतांची विभागणी झाली. दुसरीकडे शिवसेना आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे बोलतात एक आणि करतात एक अशी भूमिका असल्याचा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला.

वरिष्ठांनी ज्याच्या बरोबर जायचे त्यांच्याशी अटीशर्थीं  मान्य करूनच जावे. जर तसे झाले नाही तर मात्र काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता हा काँग्रेसच्या विचारापासून दूर जाईल आणि मग उरलेली काँग्रेस संपुष्टात येईल असा इशाराही विक्रांत चव्हाण यांनी दिला. या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण, काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे आणि रवींद्र आंग्रे यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती होती.

साखर घेण्यापूर्वी लक्ष द्या, आता पाकिटावर लिहून येणार 'हा' सावधगीरीचा इशारा!

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेची कोंडी कायम असली तरी ती फोडण्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तोडगा निघू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली जातेय. राज्यात शिवसेनेसोबत किमान समान कार्यक्रमावर जी चर्चा झाली त्यावर उद्या त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी पाच ते सहा मुद्यांवर चर्चा होणार आहे. नवं सरकार पाच वर्ष सरकार टिकले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची. लोकसभेत सोबत राहायचं का? विधानसभा अध्यक्षपदाबाबत काय करायचं, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न इत्यादी प्रश्नांवर उद्याच्या बैठकीत निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी 5 वाजता ही बैठक होणार आहे.

काँग्रेसकडून निर्णय आल्यानंतरच राष्ट्रवादी निर्णय घेईल. काँग्रेसचा निर्णय आल्यानंतर काहीच वेळ लागणार नाही. मात्र असे निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलीय.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता, उद्धव ठाकरे करणार आमदारांशी चर्चा

राऊत पवारांच्या भेटीला

महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्यासाठी आता शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती पुढे आलीय. आज होणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची बैठक आता बुधवारी नवी दिल्लीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं पवारांना भेटणं हे महत्वाचं मानलं जातंय. राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेऊन चर्चा केलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते हे दिल्लीत दाखल झाले असून ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगितलं असून शुक्रवारी उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी बोलणार आहेत.

 

 

Published by: Ajay Kautikwar
First published: November 19, 2019, 10:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading