'युती'चे नाराज नेते संपर्कात, काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

'काकाच्या आशीर्वादानेच पुतणे राजकारणात मोठे झाले आहेत हे अवधूत तटकरे विसरले त्यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल.'

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 05:49 PM IST

'युती'चे नाराज नेते संपर्कात, काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

सागर कुलकर्णी, मुंबई 9 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला लाचारी पत्करत भाजपसोबत युती करावी लागतेय. त्यामुळे अनेक बडे नेते नाराज आहेत. 'युती'चे हे बडे नेते तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. हे नेते कोण आहेत याचा खुलासा लवकरच होईल असंही त्यांनी सांगितलं. वडेट्टीवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना आघाडीसोबत यायचंच नव्हतं. यामुळे त्यांनी कधीच चर्चा केली नाही धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत न करता भाजपाला मदत करण्याचा त्यांचा अजेंडा आहे आणि हे सर्व कशासाठी करत आहेत हे पुढच्या काळात आपण सांगूच असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी  जोरदार टीका केली. काकाच्या आशीर्वादानेच पुतणे राजकारणात मोठे झाले आहेत हे अवधूत तटकरे विसरले त्यांचा शिवसेनेत जाण्याचा निर्णय आत्मघातकी ठरेल अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी यांच्या शंभर दिवसाच्या सरकारने देशात मंदिर बनवलं, सर्व बेरोजगारी संपवली, विकास केला असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला. सरकार फक्त प्रचार करत असल्याचंही ते म्हणाले.

( वाचा : मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका, बघा तुमच्या भागाला काय मिळालं? )

लवकरच ठरणार युतीचा फार्म्युला

Loading...

विधानसभा निवडणुकीसाठी  'युती'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतिम चर्चेला सुरुवात झालीय. या आधी प्राथमिक चर्चा झाली असली तरी ही चर्चा अंतिम फॉर्म्युला ठरविण्यासाठी असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालंय. चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या असून अजुन काही फेऱ्या होणार आहेत. झालेल्या चर्चेचा तपशील दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या ज्येष्ठ नेत्यांना देत आहेत. अंतिम तोडगा निघाल्यानंतरच भाजपचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गणेश विसर्जनापूर्वी हा तोडगा निघणार असल्याची शक्यता आहे.

भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत असून शिवसेनेकडून सुभाष देसाई त्यात सहभागी आहेत. आज या सर्व नेत्यांमध्ये चर्चेच्या काही फेऱ्या झाल्यात मित्र पक्षांना द्यावयाच्या जागा आणि त्यानंतर दोन्ही पक्षांनी लढायच्या जागा, काही जागांची अदलाबदल अशा सर्व विषयांवर यात चर्चा झाली.

( वाचा : वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO )

निवडून येण्याची ताकद हाच सर्वात महत्त्वाचा निकष असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. काही ठिकाणी दोन्ही दोन्ही पक्षांचा दावा असून तिथेच थोडा पेच निर्माण झालाय. मात्र चर्चेच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास दोन्ही पक्षांनी व्यक्त केलाय.

या चर्चानंतर चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना चर्चेची सर्व माहिती दिली. भाजप शिवेसेनेच्या बैठकीत काही जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच घटकपक्षांना नेमक्या कोणत्या 18 जागा द्यायच्या याविषयी बैठकीत चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...