मुंबई, 28 डिसेंबर : महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि राज्यपाल (Governor vs MVA Government) यांच्यातील वादामुळे अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Maharashtra Assembly Speaker Election) पार पडली नाही. पण, आमच्याकडे 174 आमदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे आणि आता आणखी काही आमदार वाढणार आहेत, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपमधील काही आमदार फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. विधान परिषदेत पत्रकारांशी बोलत असताना नाना पटोले यांनी या मुद्दावरून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
'घटनात्मक अधिकार जे होते त्या अधिकारात त्यांनी राज्यपालांना पत्र दिले होते. मुख्यमंत्र्यांना जे अधिकार होते त्या अधिकारात त्यांनी एक राज्यपालांना पत्र दिले होते त्यानंतर राज्यपालांचे सहा वाजता पत्र नाही आल्याने आम्ही प्रक्रियेला सुरुवात केली. आज राज्यपालांनी सकाळी ही प्रक्रिया घटनाबाह्य आहे असे पत्र पाठवल्याने आम्हाला निवडणूक रद्द करावी लागली. आज सकाळी राज्यपालांचे पत्र आले त्याचा सन्मान केला गेला आणि विधानसभा अध्यक्षांची निवडणुक पुढे ढकलण्यात आली आहे' असं पटोले यांनी सांगितलं.
(इंग्लिश गाण्यावर डान्स करताना Sapna Chaudhary चा Video Viral, चाहते म्हणाले..)
'विषारी विचार राज्यात विरोधक पेरत आहेत त्यासाठी सोशल मीडियावर आता गांधीदूत असतील. काल कालिचरण महाराजाने महात्मा गांधी यांना शिव्या घातल्या. हिंदू लोक गांधींचा सन्मान करतात मात्र हिंदूत्ववादी लोक त्यांना अपमानित करतात, त्यामुळे राज्यात १०००० गांधी दूत बणवणार आहे. तथाकथित कालिचरण महाराज यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पटोले यांनी केली.
तसंच, 174 आमदार हे महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे आणि आता आणखी काही आमदार वाढणार आहेत, असे संकेतही पटोले यांनी दिले.
'आम्ही दिल्लीतील सरकार नाही कोणाचेही ऐकत नाही. आम्ही लोकशाही मानतो लोकांची मतं जाणून घेतो. ते ठोकशाही आणि हुकूमशाही करणारं सरकार आहे. पहाटेची सरकार पटल्यानंतर राज्यात कुठली परिस्थिती ओढवली होती की राष्ट्रपती राजवट लावावी लागली. राष्ट्रपती राजवट सारख्या आयुधांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो हे लोकशाहीसाठी धोक्याची आहे.सभागृहात थेट राष्ट्रपती राजवटी बाबत सुधीर मुनगंटीवार सारखी लोकं धमक्या देतात, अशी टीकाही पटोलेंनी केली.
(NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे Vacancy; लगेच करा अर्ज)
'भ्रमित झालेली भाजप आता आपण पाहतोय आणि भ्रमित लोकांच्या तोंडी लागायचे नसते. अमित शहा यांनी तर भारताचा झेंडा खाली पाडला सोनिया गांधी यांनी झेंडा हातात पकडून धरला' असं म्हणत पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.