Elec-widget

भाजपची चौथी मेगाभरती 'या' तारखेला होणार, राणेंच्या प्रवेशाचा सस्पेन्स कायम?

भाजपची चौथी मेगाभरती 'या' तारखेला होणार, राणेंच्या प्रवेशाचा सस्पेन्स कायम?

भाजप प्रवेशाबाबत राणे वारंवार उल्लेख करत असले तरी भाजपकडून मात्र स्पष्टपणे काहीही सांगितलं जात नाही. त्यामुळे नेमकं कोण प्रवेश घेणार आहे हे अजुनही गुलदस्त्यात आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 19 सप्टेंबर : काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांची भाजपमध्ये प्रवेशासाठी रांग लागलीय. आत्तापर्यंत पक्षप्रवेशाचे तीन मोठे कार्यक्रम झालेत. आता पुढची चौथी मेगाभरती 22 सप्टेंबरला मुंबईत होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता महिला आर्थिक विकास मंडळ इथल्या सभागृहात काही  प्रवेश होणार आहेत. या प्रवेशात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पक्षप्रवेश होणार का हा औत्सुक्याचा विषय आहे. भाजप प्रवेशाबाबत राणे वारंवार उल्लेख करत असले तरी भाजपकडून मात्र स्पष्टपणे काहीही सांगितलं जात नाही. त्यामुळे नेमकं कोण प्रवेश घेणार आहे हे अजुनही गुलदस्त्यात आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या आधी जास्तीत जास्त प्रवेश करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

'युती'ची जागावाटापाची चर्चा पुन्हा सुरू होणार, शिवसेना 'फिफ्टी-फिफ्टीवर ठाम

भाजपची चुप्पी, राणे म्हणतात आठ दिवसांमध्ये प्रवेश होणार

राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या प्रवेशाच्या तारखेबद्दल भाजपमधून अद्याप कोणी जाहीर भाष्य केलं नसल्याने संभ्रम कायम आहे. मात्र राणे यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भाजपा प्रवेशाचा पुनरुच्चार केला आहे. येत्या आठ दिवसात आपला भाजपा प्रवेश होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'भाजप-शिवसेना युती होईल की नाही याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही. माझं बोलणं भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी झालेलं आहे. मला भाजपचे नेते पक्षात प्रवेश देणार आहेत,' असं म्हणत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Loading...

दरम्यान, नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा सावंतवाडीत मेळावा घेऊन भाजपा प्रवेशाची कल्पना दिली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आठ दिवसात आपला प्रवेश होणार असल्याचं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी शिवसेनेला दिला 'निरोप', उद्धव ठाकरे काय घेणार निर्णय?

नितेश राणेंनी भूमिका बदलली?

'नाणार रिफायनरीबाबत आजही आपण जनतेच्या सोबत असून या प्रकल्पाला त्यांचा विरोध होता म्हणूनच आम्हीही विरोधात होतो. पण आता लोकांचं म्हणणं काही वेगळं असेल तर लोकांशी चर्चा करूनच आपण तशी पावलं टाकू,' असा पवित्रा आमदार नितेश राणे यांनी घेतला आहे. नाणार रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यानी राजापूरचा सभेत केलेल्या वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी ही सावध प्रतिक्रीया दिली आहे. त्यामुळे आधी नाणारवरून आक्रमक भूमिका घेणार नितेश राणे मवाळ कसे झाले, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...