News18 Lokmat

कोर्टाने सोहराबुद्दीन कुटुंबाला म्हटलं SORRY, कारण...

हा निकाल देताना कोर्टाने सोहराबुद्दिन यांच्या कुटुंबियांना SORRY असं म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 04:04 PM IST

कोर्टाने सोहराबुद्दीन कुटुंबाला म्हटलं SORRY, कारण...

मुंबई, 21 डिसेंबर : सीबीआय कोर्टाने सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात आपला निकाल देत सर्व 22 आरोपींची पुराव्याअभावी सुटका केली आहे. हा निकाल देताना कोर्टाने सोहराबुद्दिन यांच्या कुटुंबियांना SORRY असं म्हटलं आहे. कोर्टाने पुढे म्हटलंय की, ‘सोहराबुद्दीन यांच्या परिवाराला ज्यातून जावं लागतलं त्यविषयी सहानुभूती आहे, पण कोर्ट हे पुराव्याच्या आधारावर चालतं आणि सीबीआय पुरेसे पुरावे या प्रकरणात सादर करू शकलं नाही.’

तब्बल 13 वर्षानंतर सीबीआय कोर्टाने या प्रकरणात आपला निकाल दिला आहे. कोर्टाने सर्व आरोपींची सुटका केल्यानंतर आता या सोहराबुद्दीन यांचा भाऊ रुबाबुद्दीन हा या निर्णयाला आव्हान देणार आहे.

काय आहे कोर्टाचा निर्णय?

सोहराबुद्दीन यांचा मृत्यू गोळी लागूनच झाला आहे, पण त्याचवेळी सोहराबुद्दीन यांच्या मृत्यूमागे कोणताही कट असल्याचा पुरावा नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

याप्रकरणातील सर्व 22 आरोपींची कोर्टाने पुराव्यांअभावी सुटका केली आहे. देशभरात गाजलेल्या या प्रकरणाचा अखेर 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे.

Loading...

-कट रचण्याचा आरोप सिद्ध करता आला नाही, पुरेसा पुरावा नव्हता - कोर्ट

-तुलसीरामचं अपहरण झालेलं, हेही सिद्ध झालेलं नाही

-साक्षीदार फितूर होणं, यात सरकारी वकीलांचा दोष नाही

-सोहराबुद्दीनचा मृत्यू गोळी लागून झाला हे निश्चित आहे

-पण ज्यांचावर आरोप झाला आहे ते याला जबाबदार आहेत, याबाबत सबळ पुरावा नाही

काय आहे प्रकरण?

सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसर बी यांचा 2005 मध्ये तर तुलसीराम प्रजापती यांचा 2006 मध्ये मृत्यू झाला होता. भाजपचे विद्यमान अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह आणि गुजरातच्या तत्कालीन वरिष्ठ अधिका-यांच्या इशा-यावरूनच या बनावट चकमकी करण्यात आल्या असल्याचा आरोप होता. मात्र 2014 साली शाह यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस जे शर्मा यांनी याप्रकरणी आपण 21 डिसेंबरपर्यंत निकालपत्र पूर्ण करू आणि उशीरात उशीरा म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत अंतिम निकाल देऊ, असं म्हटलं होतं.

या प्रकरणात एकूण 38 आरोपी होते, यातील 16 जणांची पुराव्याच्या अभावी याआधीच सुटका करण्यात आली होती. आता उर्वरित आरोपींचीही सबळ पुराव्यांअभावीच सुटका करण्यात आली आहे.


बीड हत्याकांड VIDEO : पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...