Home /News /mumbai /

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात वातावरण पेटलं; भाजप महिला मोर्चा अ‍ॅक्शनमध्ये

बलात्काराच्या आरोपानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे

  मुंबई, 17 जानेवारी : बलात्काराच्या आरोपानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्या महिला मोर्चातर्फे उद्या वांद्रे इथल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा नाहीतर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आरोप करणा-या महिलेविरोधात काही शंका उपस्थित करत मुंडे राजीनामा देणार नाहीत, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर हे आंदोलन होणार आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या आंदोलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत तिने तक्रार केली आहे. त्याचवेळी भाजप नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा (Renu Sharma) नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर रेणू शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केल्याचं तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नव्हते, असेही तिने यावेळी स्पष्टीकरण दिलं. उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सिंह सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते. त्यांनी माझ्यावर जे काही आरोप लावले आहे, ते खोटे व बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून समाजात माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे ही वाचा-3 महिन्यांपासून करीत होता प्लॅन; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावलं आणि... रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहे.'रेणू शर्मा नावाची महिला मला 2010 पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळं टाकून त्यात भुलवून  ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो', असं हेगडे यांनी म्हटलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Dhananjay munde

  पुढील बातम्या