Home /News /mumbai /

CM उद्धव ठाकरेंनी दिली ड्रायव्हरला सुट्टी, स्वत:च कार चालवत घेताहेत बैठका

CM उद्धव ठाकरेंनी दिली ड्रायव्हरला सुट्टी, स्वत:च कार चालवत घेताहेत बैठका

गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहेत.

मुंबई 31 मार्च : कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळा असं तज्ज्ञ सांगत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सगळ्याच ठिकाणी त्याचं पालन सुरू केलंय. बैठकांसाठी त्यांना मंत्रालय, वर्षा, महापालिका मुख्यालय असा प्रवास करावा लागतोय. कामाचा ताण वाढलाय. मात्र असं असतानाही मुख्यमंत्री स्वत:कार चालवत या बैठकांना पोहोचत आहेत. गेल्या आठवडाभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत आहेत. आज मुंबई महापालिकेत आढावा बैठक होती. त्यासाठी मातोश्रीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत बीएमसी मुख्यालयात आले. या कारमध्ये मागच्या सीटवर आदित्य ठाकरे बसले होते. सोशल डिस्टंन्सिंगचं काटोकोर पालन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे सोशल मीडियाव्दारे लोकांना घराबाहेर पडू नका, सरकार जे सांगतेय त्या नियमांचं पालन करा असं वारंवार सांगत आहेत. महाराष्ट्रात थैमान महाराष्ट्रात एका दिवसात 72 कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येने रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 302 झाला आहे. हे वाचा - शासकीय कर्मचाऱ्यांना 50 ते 75 टक्केच वेतन, लोकप्रतिनिधीनांही बसणार फटका आजचा दिवस राज्यासाठी धक्कादायक ठरला. संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम 72 ने रुग्णसंख्या वाढली. 230 वरून आकडा थेट 302 झाला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात (MMR)67 रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथे प्रत्येकी 2 रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा 72 ने वाढला आहे.

 हे वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईंनीही दिली देणगी

मुंबईत सर्वाधिक कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात. याच कस्तुरबा रुग्णालयातल्या  एका कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कस्तुरबा इथं आयाबाई म्हणून काम करणारी 44 वर्षीय महिला संक्रमित झाली आहे. कोरोनामुळे सोमवारी दोन जणांचा मृत्यू राज्यात सोमवारी कोरोनाव्हायरसमुळे 2 रुग्णांचे मृत्यू झालेत. मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात 78 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

 हे वाचा - PM Care Fund नाही तर या संस्थांना केली सैफ अली खान आणि करीना कपूरने मदत

ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. राज्यातील 39 रुग्णांची तब्येत बरी झाली, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या