Home /News /mumbai /

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचं मुंबईत निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचं मुंबईत निधन

स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले.

मुंबई, 03 ऑक्टोबर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्राध्यापक पुष्पा भावे यांचं निधन झालं. मध्यरात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थिदशेपासून त्या स्वत: राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी जोडलेल्या होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर महागाईविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासोबत लाटणे मोर्चात त्या उतरल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचं घर मिळवून देण्यापर्यंतच्या लढ्या पुष्पा भावे यांचं मोलाचा वाटा होता. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. सावधान! देशात झपाट्यानं वर सरकतोय 'कोरोना' आलेख, दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू इतकच नाही तर समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मोलाच काम केलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून ते अखेरपर्यंत त्यांचा अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं.

तुमच्या शहरातून (मुंबई)

First published:

पुढील बातम्या