Home /News /mumbai /

...म्हणून 'वर्क फॉर्म मातोश्री' करतो, उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फटकारले

...म्हणून 'वर्क फॉर्म मातोश्री' करतो, उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना फटकारले

उद्धव ठाकरे यांनी आपण 'मातोश्री'वरुन का बाहेर पडत नाही, या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

    मुंबई, 13 सप्टेंबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'मातोश्री'तून बाहेर पडत नाही अशी टीका करत आहे. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपण 'मातोश्री'वरुन का बाहेर पडत नाही, या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोनाची परिस्थिती, लॉकडाउन आणि मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी  पुन्हा राजकारण सुरू केले आहे. पण, हे संकट अजून संपले नाही. विरोधक मी 'मातोश्री'वरून बाहेर पडत नाही, असा आरोप करत आहे. पण मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे आणि काम होत आहे. आरोप करण्यांना करू द्या, त्यातूनही साध्य होणार नाही, असं प्रत्युतर उद्धव ठाकरेंनी दिले. तसंच, 'महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा डाव आखला जात आहे. पण, मी  मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे सर्व लक्षात ठेवून काम करतोय, अन्यथा उत्तर देण्यास कमी करणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सणसणीत टोलाही लगावला आहे. मराठा समाजाला केले आंदोलन न करण्याचे आवाहन 'मराठा आरक्षणाची तुमची जी भावना आहे, तीच आमचीही भावना आहे. तुमच्या मागण्या या राज्य सरकारच्या मागण्या आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कोर्टात लढा देत आहे. मराठा समाजाच्या सर्व सुचनांचा विचार करून रणनीती आखत आहे.  सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत आंदोलन काढू नका, तुम्हाला न्याय मिळवून देणे यासाठी सरकार कटीबद्ध आहे.  मराठा समाजाने अफवांना बळी पडू नये, कुणाच्या बोलण्यात येऊ नये. गैरसमज पसरवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, मातोश्री

    पुढील बातम्या