मराठी कलाकार मयुरेश कोटकरवर सूडबुद्धीपोटी कारवाई?

मराठी कलाकार मयुरेश कोटकरवर सूडबुद्धीपोटी कारवाई?

Pravin Darekar on Mayuresh Kotkar arrest: मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला अटक केल्याप्रकरणावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून: ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणात मराठी कलाकार मयुरेश कोटकर (Marathi Artist Mayuresh Kotkar) यांना अटक करण्यात आली. मयुरेश कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरुन आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकरावर निशाणा साधत ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचं म्हटलं आहे.

नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्थानिक आगरी समाज करत आहे. या मागणीसाठीच काही दिवसांपूर्वी आगरी समाजाने मानवी साखळी करुन आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनात मराठी कलाकार मयुरेश कोटकर हे सुद्धा सहभागी झाले होते.

VIDEO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची रचना कमळाप्रमाणे; पाहा कसं असेल हे Airport

...म्हणून मयुरेश कोटकरवर सूड उगवला जातोय?

प्रविण दरेकर यांनी ट्विट करत म्हटलं, "महाविकास आघाडीच्या विरोधात एखाद्या व्यक्तीने स्पष्ट भूमिका मांडली तर त्याला अटक होणे, गुन्हे दाखल होण्याचा प्रकार सरकारमध्ये घडतोय. लोकनेते. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या आंदोलनात मयुरेश कोटकर सहभागी असल्यामुळे त्यांच्यावर सूड उगवलाय जातोय का?"

या कारवाईवरुन प्रविण दरेकर यांनी म्हटलं, "एका बाजुला लोकशाहीत व्यक्तीस्वातंत्र्याचे ढोल पिटवत असताना कोटकर नावाच्या गृहस्थावर अशा प्रकारे त्याच्यावर गुन्हे दाखल करणे, अटक करणे हे निंदनीय आहे. नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या आंदोलनाच्या प्रक्रियेत कोटकर होता. फेसबूकवर प्रत्येकजण व्यक्त होत असतो. पण केवळ आपल्या विरोधात बोललं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा अशा घटना अलीकडच्या काळात सुरू आहेत. रोज अशा घटना घडत आहेत आणि लोकशाहीला हानीकारक अशा घटना आहेत. "

Published by: Sunil Desale
First published: June 15, 2021, 4:56 PM IST

ताज्या बातम्या