Home /News /mumbai /

...म्हणून remdesivir इंजेक्शनचे वाटप केले, रोहित पवारांचा भाजपवर पलटवार

...म्हणून remdesivir इंजेक्शनचे वाटप केले, रोहित पवारांचा भाजपवर पलटवार

'यावरच स्पष्टीकरण मी अगोदरच केले आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचे जे वाटप झालेले आहे ते प्रशासनाच्या मार्फत झालेले आहे'

    मुंबई, 20 एप्रिल : राज्यावर एकीकडे कोरोनाचे (maharashtra corona cases) संकट ओढावले आहे तर दुसरीकडे रेमडेसीवीर इंजेक्शनवरून (remdesivir injection) राजकीय आखाडा तापला आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप केले होते. अखेर या वाटपाबद्दल रोहित पवार यांनी खुलासा केला आहे. भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांनी वाटप केलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनच्या साठ्याावरून प्रश्नचिन्ह उपस्थितीत केला होता. याबद्दल आता रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजय देवगणचं OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण; लवकरच येतेय ही वेब सीरिज 'यावरच स्पष्टीकरण मी अगोदरच केले आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचे जे वाटप झालेले आहे ते प्रशासनाच्या मार्फत झालेले आहे. कलेक्टर सीएसच्या मार्फत हे मोफत वाटप झालेल आहे' असा खुलासा रोहित पवार यांनी केला आहे. 'भाजप रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा करत आहे ते त्यांच्याकडून होते, आमची पार्टी असं करत नाही, असा टोलाही रोहित पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. गिरगांवची गल्ली ते युरोपची रंगभूमी; किशोर नांदलस्कर यांचा थक्क करणारा प्रवास 'ज्याप्रकारे कोरोना वाढतोय. आपल्याकडे आणि इतर राज्यातही वाढतोय त्यामुळे सर्वसामान्य लोक सांगत आहे की लॉकडाउन कडक करण्याची गरज आहे. अनेक लोकं काही काम नसताना फिरत आहेत. त्यामुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन हा कडक होईल सरकार निर्देश देईल. आपल्याला मान्य करावे लागेल, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. 11 एप्रिल रोजी  रोहित पवार यांच्या हस्ते पुणे, सोलापूर आणि अहमदनगरसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे मोफत वाटप करण्यात आले होते. पुण्यात खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, प्राणवायूअभावी एकाचा मृत्यू राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेल्फेअर ट्रस्टच्या (Nationalist Congress Welfare Trust) वतीने हे वाटप करण्यात आले. रोहित पवार यांच्या हस्ते सोलापूरसाठी रेमडेसीवीर इंजेक्शनचे वाटप पदाधिकाऱ्यांमार्फत सरकारी यंत्रणेकडे सुपूर्द केले आहे, अशी माहिती खुद्द रोहित पवार यांनी ट्वीट करून दिली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या