मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /...त्यामुळे फडणवीसांनी राणेंना त्यांची जागा दाखवली, शिवसेनेच्या नेत्याची कोपरखळी

...त्यामुळे फडणवीसांनी राणेंना त्यांची जागा दाखवली, शिवसेनेच्या नेत्याची कोपरखळी

 'आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनी आमचा विरोध केला. पण, पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे'

'आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनी आमचा विरोध केला. पण, पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे'

'मुळात वातावरण चिघळवण्याची सुरुवात राणेंनी केली. त्यामुळे त्यांना अटकाव घालणे आवश्यक होतं'

मुंबई, 24 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी राणेंच्या विधानाचं समर्थन देण्यास नकार दिला. त्यांची ही प्रतिक्रिया कौतुकास्पद होती, त्यामुळे त्यांनी राणेंना जागा दाखवून दिली, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinak raut) यांनी लगावला.

नारायण राणे यांच्या अटकेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. पण, भाजपच्या नेत्यांनी राणेंच्या विधानाला समर्थन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यावर शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर किती द्यावा लागेल Toll टॅक्स,जाणून घ्या डिटेल्स

'राज्याच्या पोलीस दलावर माझा विश्वास आहे, कायद्याच्या बाहेर जाऊन ते काम करत नाहीत. मुळात वातावरण चिघळवण्याची सुरुवात राणेंनी केली. त्यामुळे त्यांना अटकाव घालणे आवश्यक होतं. देवेंद्र फडणवीस यांनी राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले नाही, याचे मला कौतुक आहे. त्यामुळे राणेंना त्यांची जागा दाखवून दिली, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत राणे यांनी केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणी विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. यावर पंतप्रधान मोदी यांनी विनायक राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यास सांगितले होते. मी अमित शहा  यांना पत्र लिहिले आहे. अटक झाल्यानंतर नारायण राणे यांनी तत्काळ केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा,  अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे.

काय म्हणाले होते फडणवीस ?

'सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.

फक्त 'टिक मार्क'ने केली नवऱ्याची पोलखोल; बायकोने केला सॉलिड जुगाड

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात यामुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठीशी आहे, असं फडणवीस म्हणाले.

First published:
top videos