मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत उंदरासाठी लिफ्टमध्ये लावलेल्या Rat Glue Pad वर चिकटला साप, कर्मचाऱ्यांची उडाली झोप

मुंबईत उंदरासाठी लिफ्टमध्ये लावलेल्या Rat Glue Pad वर चिकटला साप, कर्मचाऱ्यांची उडाली झोप

मुंबईतील मुलुंड परिसरात एका कंपनीच्या लिफ्टमध्ये उंदराला पकडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रॅट ग्लू स्टिक पॅडवर उंदराऐवजी साप चिकटल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुलुंड, 21 डिसेंबर : घरात किंवा कामाच्या ठिकाणी उंदीर झाले की आपण रॅट पॅड आणून ठेवतो. हे रॅट ग्लू पॅड इतकं चिकट असतं काही विचारायची सोय नाही. उंदराला खाणारा साप जर घुसला आणि तो या रॅट ग्लूवर चिकटला तर काय होईल? अशी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. मुंबईतील मुलुंड परिसरात एका कंपनीच्या लिफ्टमध्ये उंदराला पकडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या रॅट ग्लू स्टिक पॅडवर उंदराऐवजी साप चिकटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर कंपाऊंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उंदाराचा बंदोबस्त करण्यासाठी कंपनीच्या आवारात रॅट स्टिक पॅड ठेवण्यात आले होते. जेव्हा सकाळी पाहिले तेव्हा त्याला उंदीर तर सोडाच सापच चिकटलेल्या अवस्थेत होता. हा धक्कादायक प्रकार पाहून सुरक्षा रक्षकालाही घाम फुटला. हे वाचा-गुरु-शनीची युती,भारतात या वेळेत पाहता येणार 397 वर्षांपूर्वीची खगोलशास्रीय घटना या घटनेची माहिती मिळताच कंपनीतील नरेश राणे यांनी प्राणीमित्रांना कळवले. धामण जातीचा 3 फूटांचा हा साप बिनविषारी असल्याचं कळल्यानंतर सर्वाचा जीव भांड्यात पडला. प्राणी मित्रांच्या मदतीनं या सापाला वैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या सापाला स्टिक पॅडवरून काढलं असून त्याच्यावर उपचार केले. हा साप कसा आला याबाबत अद्याप कुणालाही माहिती मिळू शकली नाही. कंपनी उंदरांचा वावर होत असल्याचं लक्षात येताच सगळीकडे स्टीक पॅड लावण्यात आले होते. ज्यामुळे उंदीर त्यामध्ये अडकले जातील मात्र जेव्हा सकळी सुरक्षा रक्षक लिफ्टकडे पोहोचला तेव्हा त्याचीच झोप उडाली आणि तोंडातून शब्दही निघेना. त्या स्टीकपॅडवर उंदराऐवजी साप चिकटलेला होता हे पाहून त्यालाच घाम फुटला.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या