Home /News /mumbai /

Snake in Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये भला मोठा साप

Snake in Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये भला मोठा साप

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आज साप (Snake) आढळून आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील (Bombay High Court) न्यायाधीशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    मुंबई, 21 जानेवारी: मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये आज साप (Snake) आढळून आला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयातील (Bombay High Court) न्यायाधीशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायाधीश चेंबरमध्ये उपस्थित होते की नाही, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, न्यायालयात साप आढळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी 2018 मध्ये नवी मुंबईत एका न्यायाधीश यांच्यावर सापानं हल्ला केला होता. सापामुळे न्यायालयात कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या न्यायालयाच्या आवारातून सापाला बाहेर काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत. सापाकडून चावा घेऊन पत्नीची हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाकडून पती दोषी भाषावर ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कोल्लम न्यायालयाने एका व्यक्तीला साप चावून आपल्या पत्नीला मारल्याबद्दल दोषी ठरवले. केरळ पोलीस प्रमुखांनी हे दुर्मिळ प्रकरण असल्याचे वर्णन केले आहे. जेथे परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीचा पर्दाफाश झाला. कोल्लम येथील सहाव्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सूरजला गेल्या वर्षी मे महिन्यात त्याची 23 वर्षीय पत्नी उथरा हिची झोपेत नागाकडून चावा घेऊन हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्याची शिक्षा बुधवारी जाहीर केली जाईल, असे न्यायालयाने सांगितले. बाबो! पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले वार, पुण्यातील तरुणाचा प्रताप वाचून बसेल धक्का  न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, राज्याचे पोलीस प्रमुख अनिल कांत म्हणाले की, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीला दोषी ठरवण्यात आलेले हे दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलीस पथकाचे कौतुक केलं आणि ते म्हणाले की, हत्या प्रकरणाचा तपास शास्त्रोक्त आणि व्यावसायिक पद्धतीने कसा केला गेला याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai high court, Snake

    पुढील बातम्या