चपलांच्या आडून गुटख्याची तस्करी; गुन्हे शाखेने असा पकडला कोटींचा माल

चपलांच्या आडून गुटख्याची तस्करी; गुन्हे शाखेने असा पकडला कोटींचा माल

महाराष्ट्रात बंदी असताना कोणी भाजी-पाल्याच्या आडून तर कोणी चपला, शेगड्याच्या आडून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

  • Share this:

मुंबई, 3 मे : माल वाहतुकीच्या आडून गुटख्याची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने याचा भांडाफोड केला असून याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 1 कोटी 36 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रात बंदी असताना कोणी भाजी-पाल्याच्या आडून तर कोणी चपला, शेगड्याच्या आडून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

वालीव पोलिसांनी 29 एप्रिल रोजी एका गुटख्याने भरलेला कंटेनर घेवून जात असताना शकिल मोहम्मद समीम खान याला अटक केली होती. तेव्हा पोलीस तपासात महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. या कंटेनरमधून मालाची वाहतूक केली जाते. मात्र मालासोबत बक्कळ भाडे मिळत असल्याने कंटेनर चालकांनी गुटख्याची तस्करी सुरू केली होती.

गुटखा गोळा करण्यासाठी वेगवेगळे चालक जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. वालीव पोलिसांना गुटखा तस्करीची माहिती मिळताच कंटेनर चालकाला थांबवले असता त्याने शेगडी व चपलांचे पार्सल दाखवले. मात्र पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली असता गुटखा सापडला. गुटख्याने भरलेले दोन कंटेनर डहाणु तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गालगत असलेल्या हॉटेल शेर - ए - पंजाबच्या परिसरात लपवून ठेवल्या आहेत.

हे ही वाचा-पती घरी नसताना प्रेयसीला भेटायला आला तरुण; गावकऱ्यांनी दोघांचाही घेतला समाचार

हा प्रकार उघड झाल्यानंतर पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची परवानगी घेवून पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस निरीक्षक विलास चौगुले, पोलीस निरीक्षक दादासाहेब कारांडे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, योगेश देशमुख, पोलीस नाईक किरण म्हात्रे, सचिन दोरकर, अनिल सोनवणे, राजेंद्र फड, सतिष गांगुर्डे, विनेश कोकणी, बालाजी गायकवाड, सचिन बळीद, गजानन गरीबे यांनी सापळा रचून कासा येथे मुंबई - अहमदाबाद महामार्गा वरील शेर - ए - पंजाब हॉटेल परिसरात तपास केला असता तपकिरी रंगाचे एक नागालँड पासिंग व एक हरियाणा पासिंग कंटेनर उभे होते. कंटेनर चालक मदनलाल प्रेमचंद प्रजापती, नरेशकुमार बलवीर सिंग यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 36 लाख 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हा गुटखा नेमका आला कुठून कशी केली जात होती तस्करी याचा तपास वालीव पोलीस करीत आहेत.

Published by: Meenal Gangurde
First published: May 3, 2021, 10:49 PM IST

ताज्या बातम्या