स्मृती इराणी आपल्या भावावर का 'जळतात', त्यांनीच केला हा खुलासा!

स्मृती इराणी आपल्या भावावर का 'जळतात', त्यांनीच केला हा खुलासा!

एक अभिनेत्री ते केंद्रात महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री असा संघर्षमय प्रवास स्मृती इराणींचा आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक फिटनेस सर्वोत्तम असल्याचं मिकी मेहताने म्हटलंय.

  • Share this:

मुंबई 14 ऑक्टोंबर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) सोशल मीडियावर (Social Media)  चांगल्याच सक्रिय असतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमेठीमधून राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पराभव केल्यानंतर त्यांची ही सक्रीयता आणखीच वाढलीय. इराणी यांनी  फिटनेस गुरू मिकी मेहता (Mickey Mehta) यांच्याविषयी जी पोस्ट केली त्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झालीय. आपल्या भावावर त्या का जळतात, त्याचा त्यांना का हेवा वाटतो हे त्यांनी इन्स्टाग्रामवर(Instagram) पोस्ट लिहून स्पष्ट केलंय.

मिकी मेहता हे फिटनेस आणि योग गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. देशभर त्यांचे मोठे फॉलोअर्स आहेत. अनेक सेलिब्रिटीज त्यांचा सल्ला घेत असतात. मेहता यांच्या पत्नींच्याकडून ते ते इराणींचे नातेवाईक लागतात. रविवारी इन्स्टाग्रामवर त्यांनी काही पोस्ट लिहून मिकी मेहतांविषयी लिहिलंय. त्यांनी मिकी मेहतांना 'ब्रो'  (Bro) म्हणजेच भाऊ म्हणूनही संबोधलंय. इन्स्टाग्रामवर त्यांनी मिकी मेहतांचा एक फोटो  टाकून लिहीलंय की तू गुलाबजाम कसा खावू शकतोस.

मिठाई खाऊनही तू 6 Pack फिटनेस कसा राखू शकतोस असा प्रश्नही त्यांनी मिकी मेहतांना विचारलाय. त्यावर मिकी मेहतांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये त्याला उत्तर दिलंय. ते म्हणतात, प्रिय स्मृती, शारीरीक फिटनेस असता तरी तुझा मानसिक फिटनेस हा माझ्यापेक्षाही उत्तम आहे. मी तुझ्यासारखं मानसिक फिटनेस मिळविण्याचा प्रयत्न करीन. तुझासारखं सकारात्मक राहिलं तर नक्कीच आयुष्य सुंदर आणि आनंदी बनेल.

एक अभिनेत्री ते केंद्रात महत्त्वाच्या खात्याच्या मंत्री असा संघर्षमय प्रवास स्मृती इराणींचा आहे. राजकारणात त्यांना अनेक वादळांना तोंड द्यावं लागलं.संघर्ष करावा लागला. या सर्व संघर्षातून त्यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. अमेठीतून राहूल गांधी यांचा पराभव करणं हे अशक्य वाटणारी राजकीय कामगिरी त्यांनी शक्य करून दाखवली. यामुळेच मिकी मेहता यांनी स्मृती इराणींचा मानसिक फिटनेस माझ्यापेक्षाही जास्त चांगला असल्याचं म्हटलंय.

First published: October 14, 2019, 7:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading