नवी दिल्ली, 31 जुलै : खतरनाक कोरोनाव्हायरस (Coronavirus) 9 महिन्यांआधी चीनमधून पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर या व्हायरसने साऱ्या जगात थैमान घातले आहे. शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ सध्या या आजाराबाबत विविध माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, यासाठी रिसर्चही केले जात आहे. यातून विविध शोध लागत आहेत. अशाच एक रिसर्चमध्ये आता 5 वर्षांखालील मुलांकडून कोरोना संक्रमणाचा धोका सगळ्यात जास्त असल्याचे समोर आले आहे. यामुळे लहान मुलांमुळे कोरोनाबाधितींच्या संख्येत तर वाढ होत नाही आहे ना, याबाबत अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.
जगभरात कोरोनाने 6 लाख 69 हजार 632 लोकांचा जीव घेतला आहे. हा जीवघेणा व्हायरस लहान मुलांमुळे लवकर पसरतो, याबाबत पुरावे शास्त्रज्ञांना सापडले नसले तरी, शास्त्रज्ञांनी केलेल्य अभ्यासातून असे होऊ शकते, असा इशारा दिला आहे. हा रिसर्च जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने (JAMA) प्रसिद्ध केला आहे.
वाचा-10 लाख कोरोना रुग्ण झाले ठणठणीत; लोकसंख्येच्या तुलनेत सर्वांत कमी मृत्यू भारतात
मार्च 23 ते 27 एप्रिल 2020 या कालावधील रिसर्च करणारे अॅना आणि रॉबर्ट लुरी यांनी नॉर्थवेस्टर्न येथील लहान मुलांच्या रुग्णालयातील मुलांची स्वॅब केली. शिकागो, इलिनॉयमधील रूग्ण, बाह्यरुग्ण, आपत्कालीन विभाग यांची चाचणी करण्यात आली. यात 145 मुलांचा समावेश होता. या अभ्यासात 1 महिना ते 65 वर्ष अशांची चाचणी करण्यात आली. त्यांची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आली होती. पहिला गट 1 महिना ते 5 वर्ष, दुसरा 5 ते 17 वर्ष, तिसरा 18 ते 65 वर्ष.
वाचा-लवकरात लवकर रिझल्ट देणारी स्वस्त कोरोना टेस्ट किट बनवा आणि 37 कोटी जिंका
रिसर्चमध्ये काय आढळून आले?
तज्ज्ञांनी केलेल्या या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, लहान मुलांमध्ये त्यांच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागात प्रौढांपेक्षा व्हायरल लोड 10 पट ते 100 पट जास्त आहे.कोव्हिड-19 असणार्या मोठ्या मुलांमध्ये व्हायरल लोड प्रौढांमधील पातळीप्रमाणेच आहे. या अभ्यासामध्ये व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचे प्रमाण 5 वर्षां खालील मुलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले. या अभ्यासामध्ये केवळ व्हायरल न्यूक्लिक अॅसिडचा अभ्यास करण्या आला. संसर्गजन्य व्हायरसचा नाही, म्हणजेच ही मुलं व्हायरसचा प्रसार करतात की नाही हे अद्याप स्पष्ट नाही आहे.
वाचा-प्रतीक्षा संपणार! ऑगस्टमध्येच येणार कोरोना लस; रशियाने दिली आनंदाची बातमी
कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय हृदयाचा आजार
अशाच एक रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना हृदयाचा आजार होत आहे. हे संशोधन जर्मनीच्या फ्रँकफर्ट येथे जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने (JAMA) केले आहे. याअंतर्गत, यावर्षी एप्रिल ते जून दरम्यान, 40 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांवर संशोधन केले गेले होते, जे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. या 100 पैकी 67 रूग्ण होते ज्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती आणि ते बरे झाले. तर, उर्वरित 23 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णांची डॉक्टरांनी एमआरआय, रक्त चाचण्या आणि हार्ट टिशू बायोप्सी केली.