मुंबई 03 फेब्रुवारी : मुंबईतल्या आझाद मैदानावर देशद्रोहाचा आरोप असलेले शरजील इमाम याच्या समर्थनासाठी घोषणाबाजी झाल्याचा व्हिडीओ समोर आल्याने वाद निर्माण झालाय. या घोषणाबाजी विरोधात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आघाडी उघडलीय. मुंबईत हे काय चाललंय आणि महाराष्ट्र सरकार हे कसं काय खपवून घेतंय असा सवाल फडणवीसांनी विचारला आहे. या मुद्यावरून भाजप पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातं.
काही दिवसांपूर्वी LGBT आंदोलना दरम्यान सर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली होती. शरजीलने पाच लाख लोक एकत्र आल्यास आसाम आणि ईशान्य भारत भारतापासून वेगळा करता येईल अशी भडकावू भाषा वापरली होती. त्यानंतर त्यावर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नंतर काही दिवसानंतर त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. शरजील हा शाहीन बाग आंदोलनाचा मोऱ्हक्या असल्याचंही मानलं जातं. मात्र शाहीन बागच्या आंदोलनकर्त्यांनी शरजीलचा आंदोलनाशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
हे पद झेपेल का?असं शिवसेनाप्रमुखांना वाटलं असतं, आठवणीने गहिवरले उद्धव ठाकरे
मूळचा बिहारचा असलेला शरजील इमाम आयआयटी मुंबई इथून कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं आहे. शरजील इमामनं तिथं काही काळ शिकवण्याचंही काम केलं आहे. ग्रॅज्युएशननंतर दोन वर्षे बेंगळुरूत एका सॉफ्टवेअर कंपनीत तो डेव्हलपर म्हणून काम करत होता. त्यानतंर 2013 मध्ये जेएनयूमध्ये आधुनिक इतिहासात त्याने मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. त्यानंतर एमफील आणि पीएचडीसुद्धा केली.
शरजील आयसामध्ये दोन वर्षांहून जास्त वेळ राहिला. त्यात एक वर्ष कार्यकारिणीचा सदस्यही होता. तसेच त्याने कौन्सिलर पदासाठी 2015 मध्ये जेएनयुची निवडणूकही त्याने लढवली होती.
What is this going on in Mumbai?
And why is the Maharashtra Government tolerating this ? pic.twitter.com/1uqnKxs2ns
गर्लफ्रेंडमुळे झाली अटक
शरजील इमामच्या गर्लफ्रेंडवर दबाव टाकल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. शरजील इमामला 28 जानेवारीला जहानाबादमधील काको येथून अटक करण्यात आली होती. यापूर्वी, शरजीलच्या शोधात सलग चार दिवस देशाच्या कित्येक भागात छापे टाकण्यात आले.
मुख्यमंत्री निवडणूक लढविणार का? उद्धव ठाकरेंनी केला सर्वात मोठा खुलासा
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात शरजीलच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आसामला भारतापासून वेगळे करण्याविषयी बोलताना ऐकू येतो. त्याच्याविरूद्ध देशद्रोहासह विविध कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली शरजील इमामला अटक
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरजीलच्या अटकेच्या दिवशी पहाटे चार वाजता दिल्ली गुन्हे शाखेच्या व बिहार पोलिसांनी शरजीलच्या भावाला ताब्यात घेतले होते. भावाची विचारपूस सुरू असताना शरजीलचा मित्र इम्रान याचा शोध लागला. इम्रानला ताब्यात घेण्यात आले असता चौकशी केली तेव्हा शरजीलच्या प्रेयसीची माहिती मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.