मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अर्थमंत्र्यांवर एकीकडे पुष्पवृष्टी तर दुसरीकडे घोषणाबाजी, मुंबईत रंगला काँग्रेस-भाजपचा 'सामना'

अर्थमंत्र्यांवर एकीकडे पुष्पवृष्टी तर दुसरीकडे घोषणाबाजी, मुंबईत रंगला काँग्रेस-भाजपचा 'सामना'

सीतारामन आणि यांच्या आगमनापर्यंत काँग्रेसचा मोर्चा संपत आला होता. तर दुसरीकडे सीतारामन यांच्या स्वागताची भाजपची तयारी जोरदार सुरू होती.

सीतारामन आणि यांच्या आगमनापर्यंत काँग्रेसचा मोर्चा संपत आला होता. तर दुसरीकडे सीतारामन यांच्या स्वागताची भाजपची तयारी जोरदार सुरू होती.

सीतारामन आणि यांच्या आगमनापर्यंत काँग्रेसचा मोर्चा संपत आला होता. तर दुसरीकडे सीतारामन यांच्या स्वागताची भाजपची तयारी जोरदार सुरू होती.

मुंबई, 07 फेब्रुवारी : मुंबईत (Mumbai) काँग्रेसने  (Congress) आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांचा विरोध केला. मुंबई काँग्रेसच्या वतीने आज सकाळी राजा शिवाजी महाविद्यालय दादर पूर्व इथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चाला काँग्रेसच्या दिग्गजांनी हजेरी लावली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चासाठी उपस्थित होते.

या मोर्चाचा मूळ उद्देश निर्मला सीतारामन यांच्या मुंबईच्या दौऱ्याचा निषेध करणे हा होता. एकीकडे हा मोर्चा सुरू होता तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. काँग्रेसच्या मोर्चात भाई जगताप यांनी 'हा अर्थसंकल्प लोकांना फसवणाऱ्या असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती वापराचा गॅस,डाळी, पालेभाज्या सर्वच वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे' असं मत व्यक्त केलं.

यूट्यूबवर येण्यासाठी तरुणाची हत्या करुनही पोलिसांची वाट पाहत राहिले 4 आरोपी

तर दुसरीकडे निर्मला सीतारामन यांच्या स्वागतासाठी भाजपही बाईक रॅलीचे आयोजन केलं होतं. सीतारामन यांच्या पथकाच्या अगदी पुढे ही बाईक रॅली चालत होती. दादर पूर्वेच्या योगी सभागृहापर्यंत की बाईक रॅली सुरू होती. रस्त्याच्या एका टोकाला केंद्रीय मंत्री रस्त्यावर उतरून योगी सभागृहापर्यंत चालत गेल्या. त्या चालत असताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या मोर्चात मात्र त्यांना लाखोली वाहिली गेली. एकीकडे फुलांचे हार तर दुसरीकडे शब्दांचा मार असा काही प्रकार सुरू होता.

लॉजचा मालकच चालवायचा वेश्या व्यवसाय, पोलिसांनी महिलेसह पकडले रंगेहाथ

सीतारामन आणि यांच्या आगमनापर्यंत काँग्रेसचा मोर्चा संपत आला होता. तर दुसरीकडे सीतारामन यांच्या स्वागताची भाजपची तयारी जोरदार सुरू होती. त्यामुळे दोन परस्पर विरोधी चित्र एकाच रस्त्यावर पाहायला मिळाले. यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती मुंबई पोलिसांनी. रस्त्याच्या एका टोकाला होत असलेल्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतावर झाला नाही. कारण रस्त्याच्या एका टोकाला स्वागत आणि दुसर्‍या टोकाला विरोध होत होता. तरीही मुंबई पोलिसांची मजबूत 'दिवार' या दोन पक्षांच्या परस्पर विरोधी कार्यक्रमांच्यामध्ये होती. आणि ही 'दिवार' शेवटपर्यंत अभेद्य राहिली. त्यामुळे काँग्रेसचा मोर्चा आणि केंद्रीय मंत्र्यांचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला.

First published: