मुंबई: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणाला पोलीस कोठडी

मुंबई: 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, तरुणाला पोलीस कोठडी

घरासमोर खेळत असलेल्या तरुणीला ढोलकी बनवण्याच्या दुकानात बोलावून तिच्यावर अमानूष लैंगिक अत्याचार केली. या संपर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 02 मे : भिवंडीमध्ये 6 वर्षीय मुलीवर राहत्या घरासमोर खेळत असताना एका 18 वर्षीय नराधम तरुणानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. भिवंडीच्या ब्रम्हानंद नगरमध्ये कामतघर इथे बुधवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.

घरासमोर खेळत असलेल्या तरुणीला ढोलकी बनवण्याच्या दुकानात बोलावून तिच्यावर अमानूष लैंगिक अत्याचार केली. या संपर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून अत्याचारी तरुण प्रतिक उर्फ माउली परमेश्वर कुंभार (18 ब्रम्हानंद नगर ) यांस नारपोली पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

6 वर्षीय मुलीला घरासमोर खेळत असताना नराधमाने तिला खाऊचं अमिश दाखवून त्याच्या ढोलकी बनवण्याच्या दुकानात बोलावलं. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलगी घरात आल्यानंतर ती वेदनेनं व्याकूळ झाली होती. त्यामुळे आजीने चौकशी केली असता अत्याचाराचा प्रकार उघड झाला.

हेही वाचा: सेटवर बाळाला दुध पाजताना अभिनेत्रीचा फोटो व्हायरल, युजर्स म्हणाले...!

या घटनेप्रकरणी मुलीच्या आजीने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रतिक या नराधमाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या संतापजनक घटनेची दखल घेऊन एपीआय विष्णू आव्हाड यांनी अत्याचारी प्रतिक याचा शोध घेऊन त्याला तात्काळ ताब्यात घेतलं आहे.

आरोपी प्रतिकला गुरुवारी भिवंडी न्यायालयात हजर केरण्यात आलं. न्यायालयाने या गंभीर घटनेची दखल घेऊन अत्याचारास ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सगळ्यात गंभीर म्हणजे भिवंडी परिसरात जानेवारी  2019 ते आजपर्यंत बलात्कार झाल्याच्या तब्बल 17 घटना घडल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. त्यामुळे वाढत्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे.

टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

First published: May 2, 2019, 8:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading