राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार.. वीज पडून 6 ठार, पुलावरून तिघे गेले वाहून

राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार.. वीज पडून 6 ठार, पुलावरून तिघे गेले वाहून

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे मोरगाव पुलावरून तिघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.

  • Share this:

मुंबई,6 ऑक्टोबर: राज्याच्या काही भागात परतीच्या पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. जालना आणि नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे मोरगाव पुलावरून तिघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे.

जालन्यात वीज पडून 3 ठार, 2 जखमी

जालन्यातील भागडे सावरगाव येथे वीज पडून 3 ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपार ही घटना घडली. सोयाबीन सोंगणीचे काम करत असताना शेतात काम करणाऱ्यांवर वीज कोसळली. मृतांमध्ये 2 महिलांसह 1 पुरुषाचा समावेश आहे.

जालना तालुक्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारात वीज कोसळून 3 जणांचा जागेवर मृत्यू झाला. गयाबाई नाईकनवरे, संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिला या घटनेत मृत्युमुखी पडली आहे. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे. सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी शेती गेलेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुलावरून तिघे गेले वाहून...

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे मोरगाव पुलावरून तिघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना पहाटे सव्वा पाच वाजेदरम्यान घडली. म्हणकाली देवीच्या आरतीसाठी ही दुर्घटना घडली. एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी टापूत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे ओढे नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. अग्रणी नदीला पूर आला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी दुथडी भरुन वाहत आहे. सलग चार-पाच पाऊस सुरूच होता. तासगाव तालुक्याच्या पूर्वेकडील वायफळे, बिरणवाडी, सिध्देवाडी, दहिवडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, बोरगाव, शिरढोण, अलकुड एम, कवठेमहांकाळ शहर, लांडगेवाडीसह पश्चिम भागातही तूफान पाऊस झाला.

मुसळधार पावसामुळे अग्रणी पात्रातील सावळज-बिरणवाडी व मळणगाव-योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. याशिवाय खेड्यांना जोडणारे ओढा पात्रावरील छोटे पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत.

नाशिक जिल्ह्यात पावसाचे तीन बळी...

नाशिकमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात दोघांचा तर दिंडोरीत एकाचा मृत्यू झाला आहे. यमुना गांगोडे (वय-65, रा.दिंडोरी), भरत भले व हीराबाई सदगीर (रा.इगतपुरी) अशी मृतांची नावे आहेत. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथेही परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. रोझोद्यात ज्वारीचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

CCTV VIDEO:हेल्मेट घालून भरदिवसा ICICI बँकेत दरोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2019 05:27 PM IST

ताज्या बातम्या