बहिणीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या भावाने झोडपलं, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

बहिणीची छेड काढणाऱ्याला मुलीच्या भावाने झोडपलं, मारहाणीत तरुणाचा मृत्यू

बहिणीला त्रास होत असल्याने चिडलेल्या नरेशने अजयला धडा शिकविण्याचं ठरवलं आणि एका चौकात गाठून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

  • Share this:

मुंबई 26 जुलै : बहिणीची वारंवार छेड काढणाऱ्या एका तरुणाला मुलीच्या भावाने जबर मारहाण केली. यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडलीय. बहिणीला छेडल्याचा राग अनावर झाल्याने त्या त्याने धडा शिकविण्यासाठी हे कृत्यू केलं. पण ती मारहाण एवढी भयानक होती की उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्याला अटक केलीय.

नरेश सोनी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. अजय विश्वकर्मा हा आपल्याला त्रास देतो अशी तक्रार नरेशच्या बहिणीने त्याच्याकडे केली होती. अजयने नरेशच्या बहिणीला तू माझ्यासोबत लग्न करतेस का? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतरही तो तिच्यावर वारंवार शेरेबाजी करत असे. त्यामुळे चिडलेल्या बहिणीने अजयची भावाकडे तक्रार केली.

धक्कादायक : मुंबईत दहा वर्षांची मुलगी बनली आई

नरेश आणि अजय हे एकाच भागात राहत होते. बहिणीला अजय त्रास देत असल्याने नरेशला राग आला होता. कुठल्याही परिस्थितीत त्याला रोखण्यासाठी नरेश संधीची वाटत बघत होता. एक दिवस त्याने अजयचा माग काढत त्याला गाढलेच. बहिणीला त्रास होत असल्याने चिडलेल्या नरेशने अजयला धडा शिकविण्याचं ठरवलं आणि एका चौकात गाठून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत अजयच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्याच्या पालकांनी त्याला सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

गर्दीचा आणखी एक बळी.. डोंबिवलीत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

मात्र दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला केईएममध्ये पाठवलं. तिथे उपचारादरम्यानच अजयचा मृत्यू झाला. अजयच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नरेश सोनी याला अटक केलीय. नरेशवर 307चं कलम लावण्यात आलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 26, 2019, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading