फटाके घेऊन देतो असे सांगून चुलत भावानेच केला बहिणीवर अत्याचार

फटाके घेऊन देतो असे सांगून चुलत भावानेच केला बहिणीवर अत्याचार

नराधम भावाने तिला झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिचे नाक, तोंड दाबून तिची केली निर्घृण हत्या...

  • Share this:

रवी शिंदे,(प्रतिनिधी)

भिवंडी,30 ऑक्टोबर: चुलत भावानेच पाच वर्षीय बहिणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. भिवंडी तालुकयातील सरवली येथे पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. आता या घटनेला वेगळे वळण लागले आहे.

चुलत बहिणीला दिवाळी सणासाठी फटाके घेऊन देतो, असे सांगून नराधम भावाने तिला झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिचे नाक, तोंड दाबून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली होती.

या संतापजनक घटनेचा कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना या घटनेतील आरोपी 13 वर्षीय सख्खा चुलत भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी सहावीत शिक्षण घेत आहे. या अल्पवयीन विधिसंघर्ष आरोपीस ताब्यात घेऊन बुधवारी बालन्यायालयात हजर करण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपीची रवानगी भिवंडी येथील बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

दीराने अल्पवयीन मित्रांसह वहिणीवर केला सामूहिक बलात्कार!

भिवंडीत गेल्या महिन्यात अशीच धक्कादायक घटना घडली होता. एका विवाहित महिलेवर त्याच्या दीरासह त्याच्या चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. भिवंडी शहरातील अंजुरफाटा येथे भिवंडी रोड रेल्वे स्टेशन परिसरातील निर्जन झुडपात एका 25 वर्षीय विवाहितेवर दीरासह चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. बलात्कारानंतर आरोपी फरार झाले होते. काही तासांतच नारपोली पोलिसांनी नराधमांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले होते.

VIDEO:'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 07:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading