गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याची तारीख ठरली!

गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात, साखरपुड्याची तारीख ठरली!

एका इंजिनिअर तरुणासोबत कार्तिकीचं लग्न होणार असून साखरपुड्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जुलै : मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गायिका कार्तिकी गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. एका इंजिनिअर तरुणासोबत कार्तिकीचं लग्न होणार असून साखरपुड्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 26 जुलैला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे.

'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स'ची विजेती असलेल्या कार्तिकीच्या वडिलांनी हे लग्न जमवाताना पुढाकार घेतला आहे. वडिलांच्या मित्रपरिवारातीलच पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीची लग्नगाठ बांधली जाणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोनित पिसे याचा स्वत:चा व्यवसायही आहे. यााबाबत झी24 तास या वाहिनीने वृत्त दिलं आहे.

आनंदाच्या क्षणी काय म्हणाली कार्तिकी?

'हे सगळं अचानक ठरलं. आमचं अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. संगीताचा वारसा मी पुढेही जपणार आहे. रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा दिल्या आहेत,' असं कार्तिकी गायकवाड म्हणाली.

दरम्यान, कार्तिकी गायवाडच्या साखरपुड्याची तारीख निश्चित झाली असली तरीही अद्याप लग्नाचा मुहुर्त ठरवण्यात आलेला नाही.

संकलन,संपादन - अक्षय शितोळे

First published: July 4, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading