Elec-widget

मुंबई एअरपोर्टवरची शेवटची ठरली गायिका गीता माळीची FB पोस्ट, अपघातात दुदैर्वी मृत्यू

मुंबई एअरपोर्टवरची शेवटची ठरली गायिका गीता माळीची FB पोस्ट, अपघातात दुदैर्वी मृत्यू

गेली दोन महिने त्या अमेरिकेत कार्यक्रम करत होत्या. तो यशस्वी दौरा आटोपून त्या मायदेशी परतल्या होत्या

  • Share this:

रवी शिंदे, मुंबई 14 नोव्हेंबर : मुंबई विमानतळवरून नाशिककडे परतत असताना प्रसिद्ध गायिका गीता माळी यांच्या कारला अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती गंभीर जखमी जखमी आहेत. अमेरिकेतील एक कार्यक्रम आटोपून त्या आल्या होत्या. त्यानंतर त्या पतीसमवेत नाशिकला आपल्या घरी जायला निघाल्या. त्यांची कार जेव्हा मुबंई-नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळ आली तेव्हा पेट्रोल पंपाजवळ गाडीला भीषण  अपघात झाला. विजय हे गाडी चालवत होते.त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांची कार रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरवर जावून आदळली. कारची गॅसच्या टँकरला जोरदार धडक बसल्याने गीता माळी यांचा जागीच मृत्यू झाला.

गेली दोन महिने त्या अमेरिकेत कार्यक्रम करत होत्या. तो यशस्वी दौरा आटोपून त्या मायदेशी परतल्या होत्या मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी अतिशय भावूक पोस्ट फेसबुकवर केली होती. #जननी_जन्मभूमी_स्वर्ग_से_महान_है, Very Happy To Black Home long time असं लिहित त्यांनी अपघाताच्या 8 तास आधी फेसबुकवर फोटोसह पोस्ट टाकली होती. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...