'ब्रा कडे पाहून ते शेरेबाजी करत' - नवी मुंबईच्या शाळेत शिक्षकाविरोधातच तक्रारी; ग्रूपचॅटवरून उजेडात आला धक्कादायक प्रकार

'ब्रा कडे पाहून ते शेरेबाजी करत' - नवी मुंबईच्या शाळेत शिक्षकाविरोधातच तक्रारी; ग्रूपचॅटवरून उजेडात आला धक्कादायक प्रकार

नवी मुंबईतल्या एका CBSE शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या इन्स्टाग्राम चॅट ग्रूपवर एका शिक्षकाने कसं विद्यार्थ्यांशी अश्लील वर्तन केलं याविषयी चर्चा सुरू झाली आणि हे प्रकरण उजेडात आलं.

  • Share this:

मुंबई, 9 मे : दिल्लीत गाजत असलेल्या Bois Locker Room नंतर आता मुंबईजवळ एका प्रतिष्ठित शाळेतला एक गैरप्रकार उजेडात आला आहे. नवी मुंबईतल्या एका CBSE शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या इन्स्टाग्राम चॅट ग्रूपवर एका शिक्षकाने कसं विद्यार्थ्यांशी अश्लील वर्तन केलं याविषयी चर्चा सुरू झाली आणि हे प्रकरण उजेडात आलं.

'माझ्या ब्राकडे पाहून त्यांनी अश्लील शेरेबाजी केली', 'तू अशा भडक रंगाच्या ब्रा वापरू नको, असं ते म्हणाले..' अशा पद्धतीच्या तक्रारी एकेका विद्यार्थिनींनी प्रायव्हेट चॅटवर केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मुलींनीच नव्हे तर एका विद्यार्थ्यानेसुद्धा या शिक्षकाविरोधातली आठवण सांगितली आहे. त्या शिक्षकाने आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावल्याचं त्यानं या ग्रूप चॅटवर लिहिलं.

मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे. नवी मुंबईतल्या या प्रतिष्ठित CBSE शाळेच्या काही विद्यार्थ्यांच्या प्रायव्हेट इन्स्टाग्राम चॅटग्रूपवर एका शिक्षकाच्या वर्तनाविषयी गेले काही दिवस चर्चा सुरू होती. मुलींच्या ब्राकडे पाहून अश्लील शेरेबाजी करणं, मुलांना नको तिथे स्पर्श करणं असे उद्योग एक शिक्षक किमान 5 वर्षांपासून करतो आहे, असे अनुभव या चॅटग्रूपवर काही विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यानंतर यातल्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेकडे ई मेल करून तक्रारही केल्याचं समजतं.

या शिक्षकाने मुंबई मिररशी बोलताना हे सगळे आरोप फेटाळले आहेत. उलट आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याने मीच एका विद्यार्थिनी आणि तिच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे, असा पवित्रा या शिक्षकाने घेतला. पण पोलिस ठाण्यात तपास केल्यास अशी कुठली तक्रार दाखल झाली नसल्याचं लक्षात आलं.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या तक्रारी निनावी असल्या तरी त्याची शाळा व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत असल्याचं सांगितलं. सेक्शुअल हरॅस्मेंट कमिटीने याची दखल घेत चौकशी सुरू केली असल्याचं समजतं. या शिक्षकाविरोधात थेट तक्रार करण्यास कुणी पुढे येत नाही. बदनामीच्या भयाने विद्यार्थी दूर राहात असावेत.

अन्य बातम्या

कोरोनापासून वाचण्यासाठी प्यायले स्वत: बनवलेलं औषध आणि त्याच औषधाने घेतला जीव

VIDEO: सावधान! या कारणांमुळे ग्रामीण भागात कोरोना पसरण्याचा धोका

धक्कादायक! कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या, नवव्या मजल्यावरुन घेतली उडी

 

First published: May 9, 2020, 4:23 PM IST

ताज्या बातम्या