सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

कळवा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • Share this:

30 एप्रिल :  मध्य रेल्वेचे रडगाणे सुरू असून आज (रविवारी) सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे हाल होत आहेत. कळवा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आधीच मेगा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा रखडलीये, त्यातच झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

पारसिक बोगदा आणि कळवा इथे सिग्नल यंत्रणेच बिघाड झाला आहे. या सिग्नल यंत्रणेतल्या बिघाडामुळे जलद आणि धीम्या अशा दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, दिवा आणि कळवा स्थानकांत प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

आधीच मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होत असताना त्यांच्या त्रासाला पारावार उरला नाही. स्टेशनवर लोकल सेवा विस्कळीत असल्याची उद्घोषणाही दिली जात आहे.

 

First published: April 30, 2017, 3:08 PM IST

ताज्या बातम्या