मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

अंगारकी चतुर्थीला घेता येणार नाही सिद्धीविनायकाचे दर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाच्या (Siddhivinayak temple) भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळी मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थी Angaraki Chaturthiदिवशीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाच्या (Siddhivinayak temple) भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळी मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थी Angaraki Chaturthiदिवशीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाच्या (Siddhivinayak temple) भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळी मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थी Angaraki Chaturthiदिवशीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, 25 फेब्रुवारी: महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी (Increasing Coronavirus Cases in Maharashtra) पुन्हा एकदा भीतीदायक स्वरुप घेऊ लागली आहे. रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. परिणामी लॉकडाऊन संपल्यानंतर सुरू करण्यात आलेली सार्वजनिक ठिकाणं पुन्हा एकदा बंद होणार की काय असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. विविध मंदिरांमध्ये देखील पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे या नियमांचे पालन करणे आवश्यक झालेच आहे.

या दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायकाच्या (Siddhivinayak temple) भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यावेळी मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थी (Angaraki Chaturthi) दिवशीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी अशा भाविकांनाच प्रवेश असणार आहे, ज्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे शिवाय ज्यांच्याकडे या रजिस्ट्रेशनचा  क्यूआर कोड (QR Code) आहे.

(हे वाचा-Lockdown Returns : मुंबईतील कार्यालयांमध्ये पुन्हा नवे बदल)

2 मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यादिवशी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत. ज्यांना दर्शनाची परवानगी आहे, त्यांना देखील सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यानच दर्शन घेता येणार आहे.

संकष्टी चतुर्थीला का करतात पूजा?

संकष्टीचा अर्थ दुः खाचा पराभव करणारा असा होतो. संकष्टी चतुर्थी हा दिवस लाडक्या गणपतीला समर्पित केलेला आहे. या दिवशी गणपतीची पूजा केली जाते, यामुळे घरात प्रसन्न वातावरण बनतं. हिंदू पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचा व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला ठेवला जातो. आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपतीला प्रथम देव मानलं आहे, म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी आपण गणपतीची पूजा करतो. चतुर्थी तिथी गणपतीची मानली जाते, म्हणून यादिवशी त्यांच्या नावानं उपवास ठेवला जातो. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते.

हा उपवास धरणाऱ्या प्रत्येक भक्ताचे सर्व संकट गणपती आपल्याकडे घेतो. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीच्या तिथीनुसार साजरी केली जाते. पुर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे 13 व्रत ठेवले जातात. यामुळं आज आम्ही तुम्हाला पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2021) ची यादी देणार आहोत.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Mumbai, Siddhivinayak Mandir