6 तास, 50 जणांची टीम; अखेर सयामी जुळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी!

6 तास, 50 जणांची टीम; अखेर सयामी जुळ्यांची शस्त्रक्रिया यशस्वी!

या मुलींची आई गरोदर असतानाच तिला जुळी एकमेकांना जोडलेली बाळ पोटात असल्याची माहिती मिळाली होती.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : मुंबईच्या परेल परिसरातील वाडिया रुग्णालयाने (mumbai wadia hospital) पुन्हा एकदा 14 दिवसांच्या सयामी जुळ्या मुलींवर शस्त्रक्रिया करून ती यशस्वी केली आहे. 6 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये 50 जणांची टीम तयार करण्यात आली होती. 14 दिवसांच्या बाळांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना एकमेकांपासून वेगळे करण्यात आले आहे. या दोन्ही मुली छातीपासून बेंबीपर्यंत एकमेकींना जोडल्या गेल्या होत्या. दोघींचे यकृत आणि छातीची काही हाडे एकमेकांना जोडलेली होती. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच त्यांच्या आई-बाबांनी बरोबर घरी जाणार आहेत.

या मुलींची आई गरोदर असतानाच तिला जुळी एकमेकांना जोडलेली बाळ पोटात असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून या बाळांना एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी योग्य रुग्णालयाची शोध घेत होते. तेव्हा त्यांना वाडिया रुग्णालयाबद्दल माहिती मिळाली आणि मग त्यांनी वाडिया रुग्णालयाशी संपर्क केला. गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यापासून ते बाळांचे शस्त्रक्रिया यशस्वी होईपर्यंतची सगळी प्रक्रिया वाडिया रुग्णालयाने केली आहे.

दिल्लीच्या घटनेमागे भाजपचाच हात, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा थेट आरोप

वाडिया रुग्णालयाच्या बाल रोग तज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची असल्याचे सांगितले आहे. 'यापूर्वीच्या शस्त्रक्रिया आणि यकृत एकमेकांपासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेत खूप वेगवेगळ्या गोष्टी गुंतलेल्या असतात. परंतु, आमच्या डॉक्टरांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया यांचा अनुभव असल्यामुळे ही शस्त्रक्रिया 6 तासात इतक्या लहान मुलांवर यशस्वीरित्या करण्यात आल्याबद्दल आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व आयुध शस्त्रक्रियासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि अनेक वस्तू वाडिया रुग्णालयाने विकत घेण्यास परवानगी दिली याबद्दल त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनी बोधनवाला यांनी सुद्धा 'रुग्णालय अशा शस्त्रक्रियांच्या बाबतीत खर्चाचा विचार न करता बाळ आणि त्यांचे आई-वडील यांचा विचार करते आणि शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी करण्यावर भर देते', असं प्रतिपादन केलं आहे.

कोरोनानं नोकरी हिरावली, सुरू केला बिझनेस, आता महिन्याला लाखभर कमावतो

आम्हाला आनंद आहे की, 'आमच्या माहितीप्रमाणे देशातील सयामी जुळ्यांना चौथी 100% यशस्वी शस्त्रक्रिया करणारे आम्ही एकमेव रुग्णालय आहोत'. तर या बाळांची आईने रुग्णालयाचे आभार मानत 'अशा बाळांना ते जसे आहेत तसे स्वीकारा त्यांना टाकून देऊ नका किंवा पोटातच संपवण्याचा विचार करू नका, कारण ती आपली बाळं आहेत' अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

Published by: sachin Salve
First published: January 27, 2021, 4:09 PM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या