मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /लॉकडाउन वाढवण्यात यावा की नको, कॅबिनेट मंत्र्यांमध्येच मतभिन्नता? 

लॉकडाउन वाढवण्यात यावा की नको, कॅबिनेट मंत्र्यांमध्येच मतभिन्नता? 

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होत असून या बैठकीत सध्या ब्रेक द चॅन अंतर्गत खडक निर्बंध नियमावली लागू केली आहे यात सरसकट महाराष?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होत असून या बैठकीत सध्या ब्रेक द चॅन अंतर्गत खडक निर्बंध नियमावली लागू केली आहे यात सरसकट महाराष?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होत असून या बैठकीत सध्या ब्रेक द चॅन अंतर्गत खडक निर्बंध नियमावली लागू केली आहे यात सरसकट महाराष?

मुंबई, 27 मे : कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. 1 जूनला लॉकडाऊन संपत आहे, त्यामुळे निर्बंध हटवले जाणार की कायम राहणार याबद्दल राज्य मंत्रिमंडळाची (MVA Govement) बैठक आज  होत आहेत. पण, राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या वेगवेगळ्या मतभिन्नता आता सध्या सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावलीबाबत समोर येत आहे.

ब्रेक द चेनअंतर्गत कडक निर्बंध नियमावली 1 जूनपर्यंत लागू आहे, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने तसंच मृत्यूचं प्रमाण देखील वाढत असल्याने सध्याचे कडक निर्बंध नियमावली पुढे अजून काही दिवस लागू करावी का याबाबत राज्य मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आहे.  ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू असून जिथे रुग्ण संख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये काही शिथिलता आणावी का याबाबत विचार मंथन केला जाणार आहे.  राज्यात सरसकट सगळीकडेच सध्याची कडक निर्बंध नियमावली लागू ठेवावी यावर देखील चर्चा केली जाणार आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या वेगवेगळ्या मतभिन्नता सध्या सुरू असलेल्या कडक निर्बंध नियमावलीबाबत समोर येत आहे.

मुंबईतील ग्रांट रोडमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 मॉडेल्सची सुटका

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतानाा माहिती दिली आहे की, राज्यात सध्या सुरूअसलेली कडक निर्बंध यात काही प्रमाणात शिथिलता द्यावी, अशी लोकांची मागणी आहे. वास्तविक महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने जिथे रुग्ण संख्या कमी आहे, अशा भागांमध्ये शिथिलता मिळावी अशी मागणी आहे. याबाबत राज्यातील काही मंत्री देखील सकारात्मक आहेत यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

दुसरीकडे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मात्र, 'राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे ही वस्तुस्थिती आहे पण या जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या वाढते असे नाही. यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे, अशाच ठिकाणी किंवा मोठ्या शहरांमध्ये ज्या भागांमध्ये रुग्ण संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार केले जावे. संपूर्ण राज्यात सरसकट कडक निर्बंध नियमावली लागू करू नये', असं मत न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळामध्ये सर्व सहकारी मंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतील अशी भूमिका देखील यांनी बोलून दाखवली आहे.

''सर..माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?'', यावर काय म्हणाले मुंबई पोलीस

दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी 'छोटे छोटे दुकानदार यांना पुढील काळामध्ये मुंबईत रुग्ण संख्या कमी असल्याने काही प्रमाणात दुकाने उघडण्यात यावी याचा विचार केला जाईल' असे सांगितले आहे.  कॅबिनेटमधील मंत्री कडक निर्बंध नियमावली सरसकट लागू करावी का नाही यावरून मतभिन्नता दिसून येत आहे, आज मंत्रिमंडळामध्ये आता सर्व या बाबींवर विचार करून काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे.

First published:
top videos