मुंबई 07 ऑक्टोबर: देशात महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा सर्वात जास्त प्रकोप आहे. आणि महाराष्ट्रात मुंबई हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट आहे. कोरोनाविरुद्ध बीएमसीची सर्व हॉस्पिटल्स निकराची झुंज देत आहेत. मात्र में बृहन्मुंबई महानगर पालिके (BMC)च्या अनेक हॉस्पिटल्समध्ये गेल्या दोन महिन्यापासून PPE किट्स आणि ग्लोजची तीव्र टंचाई असल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मास्क, पीपीई किट्स, ग्लोज आणि इतर साहित्याची खरेदी ही महापालिकेचा खरेदी विभाग करत असतो. मात्र या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्याने खरेदी प्रक्रिया थंडावली आहे. पालिकेकडे असलेला स्टॉक संपण्याच्या बेतात असून खरेदी केव्हा होणार असा आता प्रश्न विचारला जात आहे.
पालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये दर आठवड्याला 1 लाख 25 हजार पीपीई किट्स लागतात. रुग्णांची संख्या वाढत असल्याने या सुरक्षा साधनांचा सातत्याने पुरवढा होणे आवश्यक आहे.
काढा प्यायल्यामुळे लिव्हरला त्रास होतो? आयुष मंत्रालयाने काय सांगितलं पाहा!
मात्र या दप्तर दिरंगाईमुळे खरेदीच थंडावल्याने ही सुरक्षीत साधणं येणार तरी कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याच महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. पीपीई किट्सचं टेंडर काढायला आणि त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली आहे.
महाराष्ट्राची काय स्थिती?
महाराष्ट्रात coronavirus चे hot spots ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातली नवीन रुग्णसंख्या सातत्याने खाली येत असल्याने दिलासादायक चित्र दिसत आहे. पण मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या दैनंदिन Covid-19 आकडेवारीवरून काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाचा धोका वाढताना दिसतो.
... म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट Facebook ने केली
विशेषतः ग्रामीण भागात या विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचं दिसतं. 6 ऑक्टोबरला राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, राज्यात 2,47,023 कोरोना रुग्ण उपचाराधीन (Active patients)आहेत. गेल्या 24 तासांत 12,258 नवे रुग्ण राज्यात सापडले, तर 370 जणांचं Covid मुळे निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus