अवघ्या एक रुपयासाठी दुकानदाराकडून वृद्धाची हत्या

कल्याणमध्ये अवघ्या एका रुपयासाठी दुकानदारानं ग्राहकाची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. मनोहर गामने असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

कल्याणमध्ये अवघ्या एका रुपयासाठी दुकानदारानं ग्राहकाची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. मनोहर गामने असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

  • Share this:
03 फेब्रुवारी : कल्याणमध्ये अवघ्या एका रुपयासाठी दुकानदारानं ग्राहकाची हत्या केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. मनोहर गामने असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. गामने हे कल्याणच्या रामबाग विभागात राहतात. कामावरून घरी परत जाताना ते प्रभू ब्रदर्स नावाच्या दुकानात गेले. तिथं त्यांनी अंडी खरेदी केली. पण अंड्यांसाठी एक रुपया कमी पडला. तो नसल्यानं दुकानदार सुधाकर प्रभू आणि मनोहर गामने यांच्यात वाद झाला. वादानंतर घरी गेलेले मनोहर हे मुलाला घेऊन पुन्हा दुकानात आले. यावेळी दुकानदार आणि गामनेंमध्ये हाणामारी झाली. या हाणामारी वेळी सुधाकरनं मनोहर यांना उचलून भिंतीवर आपटलं. यात मनोहर गामने यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सुधाकर प्रभूला अटक केलीय. अवघ्या एका रूपयांच्या वादातून हत्या झाल्यानं समाजातला संयम कमी होत चाललाय का असा प्रश्न पडू लागलाय.
First published: