बदला घेण्यासाठी तो पहाटे घरात घुसला, चेंबूरमध्ये गोळीबाराची थरारक घटना

बदला घेण्यासाठी तो पहाटे घरात घुसला, चेंबूरमध्ये गोळीबाराची थरारक घटना

नवनीत राणा आणि त्याच्या भावाने सादिक आणि त्याच्या भावाला तोंडाला मास्क घालण्याचे सांगितले होते.

  • Share this:

मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 18 जून :  मुंबईतील चेंबूर स्टेशनजवळील पी वाय थोरात मार्गावर 4 जणांनी एक व्यक्तीवर त्याच्या घरात घुसून  गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे.

आप-आपसातील वादातून हा गोळीबार करण्यात आला. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. यात काळात पी वाय थोरात मार्ग परिसरात राहणाऱ्या नवनीत राणा आणि त्याच्या भावाने  सादिक आणि त्याच्या भावाला तोंडाला मास्क घालण्याचे सांगितले होते. त्यामुळे मास्क घालण्यावरून वाद झाला होता.

बहिणीच्या वरातीआधी निघाली भावाची अंत्ययात्रा, संपूर्ण गावाला अश्रू अनावर

त्यानंतर सादिक आणि इतरांनी नवनीत राणा आणि त्याच्या भावावर तीक्ष्ण हत्याराने वार केले होते. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी आरोपींना अटक सुद्धा केली होती. हल्ला करणाऱ्या मध्ये सादिक इनायत खान हा सुद्धा होता. त्याचा राग नवनीत राणा याच्या मनात होता.

आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास तीन जणांना सोबत घेऊन नवनीत हा सादिक याच्या घरी पोहचला. सादिकला आवाज दिला. सादिकने दार उघडताच त्याच्यावर आपल्याजवळ असलेल्या शस्त्रातून गोळ्या झाडल्या आणि पळून गेला.

सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती पोलीस स्थानकात हजर, चौकशी सुरू

या प्रकरणी सादिकची पत्नी मेहरूनिसा याच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 18, 2020, 1:01 PM IST

ताज्या बातम्या