नवऱ्याच्या कटकटीला वैतागून पत्नीचं 'शोले स्टाईल' आंदोलन

नवऱ्याच्या कटकटीला वैतागून पत्नीचं 'शोले स्टाईल' आंदोलन

  • Share this:

27 मे : सतत कटकट करणाऱ्याला नवऱ्याला अद्दल घडवण्यासाठी आजवर आपण बाईकोला 'मी कायमची माहेरी निघून जाईल' अशी धमकी देताना पाहिलं असेल. पण तुम्ही कोणाला 'शोले स्टाईल'मध्ये आत्महत्या करण्याची धमकी देताना पाहिलय? नाही ना... पण डोंबिवलीतील दत्त नगरमध्ये राहणारे रहिवासी याला अपवाद आहेत. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका तरुणीनं पतीला कायमची अद्दल घडवण्यासाठी शोले स्टाईलमध्ये टेरेसवरुन उडी मारत असल्याचं नाटक केलं. डोंबिवलीत घडलेल्या या प्रकारानं बघ्यांचं मात्र चांगलच मनोरंजन झालं.

डोंबिवलीच्या दत्त नगर भागात बुधवारी दुपारी ही घटना घडली. या भागात राहणाऱ्या या जोडप्यानं अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. मात्र त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागली. रोजच्या कटकटीमुळे वैतागलेल्या तरुणीने आपला पतीला धडा शिकवाय ठरवलं. त्यासाठी तिनं अनोखी शक्कल लढवली आणि शेजारच्या चार मजली इमारतीच्या टेरेसवर जाऊन उडी मारत असल्याचं भासवलं. नवऱ्याने आपलं ऐकावं आणि आपली माफी मागावी. त्याला तात्काळ इथे घेऊन या. नाही तर या इमारतीवरून उडी मारेल, अशी धमकी देत ती जोरजोरात ओरडू लागली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली आणि ते ही घटना मोबाइलवर चित्रित करण्यात गुंतले. हा 'शोले स्टाईल'चा थरार बघण्यासाठी इमारतीखाली तोबा गर्दी जमली होती.

जवळपास तासभर हा ड्रामा सुरू होता. त्यानंतर घाबरलेल्या नवऱ्याने पुन्हा भांडणं न करण्याची हमी देत माफी मागत तिची समजूत काढली आणि तिला आत घेतलं. यानंतर रामनगर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेऊन तिची समजूत काढली आणि कुणाचा त्रास होत असेल तर पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देत घरी पाठवलं. या घटनेनं डोंबिवलीकरांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं.

First published: May 27, 2017, 3:32 PM IST

ताज्या बातम्या