S M L

मुंबईतल्या सभेत भाषण करताना असदुद्दीन ओवैसींवर फेकली चप्पल

मंगळवारी रात्री एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांच्या उपस्थितीत असदुद्दीन ओवैसींचं भाषण सुरु होतं. त्याचवेळी ओवैसींच्या दिशेनं काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला

Sachin Salve | Updated On: Jan 24, 2018 08:50 AM IST

मुंबईतल्या सभेत भाषण करताना असदुद्दीन ओवैसींवर फेकली चप्पल

मुंबई, 24 जानेवारी : मुंबईतील नागपाडा भागामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींच्या सभेत राडा झाला आहे. मंगळवारी रात्री एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांच्या उपस्थितीत असदुद्दीन ओवैसींचं भाषण सुरु होतं. त्याचवेळी ओवैसींच्या दिशेनं काही जणांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे काही काळ गोंधळीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ओवैसींना काही काळ भाषण थांबवावं लागलं.

पोलिसांच्या सांगण्यानुसार ओवैसी तिहेरी तलाक विरोधात बोलत असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या सभेत काहींनी दगड फेकण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. यामुळे काही वेळ सभास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तात्काळ सभेत बंदोबस्त वाढवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. मात्र सभेत गोंधळ घालणारे कोण होते हे अध्यापही समजू शकलेलं नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं तर काही लोकांना त्रास होतो, अशी टीका या सभेत खासदार असदुद्दीन ओवैसींनी यांनी केली.

तिहेरी तलाकचे विधेयक संसदेत रखडल्यामुळे निराश झालेल्या लोकांकडून हा हल्ला करण्यात आला होता. तलाकवर सरकारचा निर्णय मुस्लिम जनतेनं स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. अशा हल्ल्यांनी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही'', असे या हल्ल्यासंदर्भात बोलताना ओवैसी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2018 08:50 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close