VIDEO : भयंकर!, शर्टाच्या वरच्या खिश्यातच मोबाईलचा स्फोट,थोडक्यात वाचला जीव

VIDEO : भयंकर!, शर्टाच्या वरच्या खिश्यातच मोबाईलचा स्फोट,थोडक्यात वाचला जीव

  • Share this:

मुंबई, 05 जून : तुम्ही मोबाईल वापरताय तर सावधान, मुंबईतील भांडुपमध्ये एका व्यक्तीच्या खिश्यात मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.

मुंबईच्या भांडुप स्टेशनजवळ असलेल्या बगीचा हॉटेलमध्ये दोन व्यक्ती जेवणासाठी आले होते. काही वेळानंतर अचानक त्यांच्या खिशातील मोबाईलमधून धूर येऊ लागला.  मोबाईलमधून धूर आल्यानंतर मोबाईलने पेट घेतला. त्याने तातडीने मोबाईल खिश्यातून काढून खाली फेकला. सुदैवाने या घटनेत त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. पण घडलेला प्रकारामुळे हाॅटेलमध्ये एकच गोंधळ उडाला होता.

परंतु मोबाईल वापरणे देखील कधी कधी जीवावर बेतू शकते हे या घटनेनं समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 08:24 PM IST

ताज्या बातम्या