VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ‘केईम’मध्ये धक्कादायक प्रकार, मृतदेह वॉर्डात ठेऊन रुग्णांवर उपचार

VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही ‘केईम’मध्ये धक्कादायक प्रकार, मृतदेह वॉर्डात ठेऊन रुग्णांवर उपचार

सायनमध्येही असा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात असे गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत असं म्हटलं होतं.

  • Share this:

मुंबई 10 मे: मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असतानाच सरकारी हॉस्पिटल्समधला गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे. सायन नंतर आता केईम हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला असून वॉर्डात मृतदेह ठेवून इतर रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं दिसून येत आहे. तर काही जण बेड नसल्याने फरशीवर झोपले आहेत.

मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून बांधून स्ट्रेचरवर ठेवल्याचं दिसून येत आहे. असे दोन मृतदेह वॉर्डात असल्याचं दिसून येत आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर 30 मिनिटींमध्ये तो वॉर्डमधून हलवणं अपेक्षेती आहे. मात्र तो नियम इथे पाळल्या गेलेला नाही असं स्पष्ट होतं आहे.

शहरात कोरोनाची साथ सुरू असताना असे प्रकार घडणं हे गंभीर मानलं जात आहे. सायनमध्येही असा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात असे गैरप्रकार सहन केले जाणार नाहीत असं म्हटलं होतं. तर मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही दोन दिवसांपूर्वी काही रुग्णालयांना भेटी देत पाहणी केली होती.

काही अडचणी असल्यास प्रशासनाशी तातडीने संपर्क साधा मात्र कामात ढिलाई राहू देऊ नका असं सांगितलं होतं. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रशासना समोरचं आव्हान वाढणार आहे.

First published: May 10, 2020, 8:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading