हाच का तुमचा 'सायन पॅटर्न'? भाजप नेत्यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

नितेश राणे यांनी सायन रुग्णालयातला व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

नितेश राणे यांनी सायन रुग्णालयातला व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 07 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. अशा परिस्थिती सायन रुग्णालयातला एका व्हिडिओ समोर आला आहे. आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला होता. त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून या प्रकरणावरून सरकारला सवाल केला आहे. 'सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही, का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी' अशी मागणी फडणवीस यांनी केली. तर, 'सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजुला रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत का? जगासमोर हाच तुमचा पॅटर्न नेणार का ?  मुख्यमंत्री, पालकमंत्री, महोदय, गरिबाची एवढी क्रुर चेष्टा का करता ? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला आहे. तसंच, ICMR च्या गाईडलाईनला हरताळ फासलं आहे? केंद्रीय पथकाने मुंबईत येऊन जी भिती व्यक्त केली होती त्यावरुन राजकारण केलेत. शेवटी काय झाले महापालिकेचे पितळ उघडे पडलेच ना' अशी टीकाही शेलार यांनी केली. आज सकाळी  आमदार नितेश राणे यांनी सायन रुग्णालयाबाबत एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला होता. या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलमधील भीषण परिस्थिती समोर आली आहे. हॉस्पिटलमधील एका वार्डमध्ये रुग्ण उपचार घेत आहे. या वार्डात मोठ्या संख्येनं रुग्ण दिसून येत आहे. एकीकडे रुग्ण उपचार घेत आहे तर तिथेच एका खाटेवर मृतदेह बांधून ठेवण्यात आले आहे. तर आणखीही मृतदेह हे याच वार्डमध्ये स्ट्रेचरवर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडून अशीच व्यवस्था केली जात आहे का? असा सवाल उपस्थितीत करत नितेश राणे यांनी मुंबई पालिकेवर टीका केली.  हा व्हिडिओ बुधवारी रात्री रेकॉर्ड करण्यात आला, असा दावा राणे यांनी केला. दरम्यान, या प्रकरणावर लोकमान्य टिळक रुग्णालयाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
    First published: